women Clerk Beaten by woman in tehsil office daund pune  sakal
पुणे

दौंड - महिला कारकूनला महिलेकडून मारहाण

दौंड शहरातील तहसील कचेरीच्या पुरवठा शाखेत प्रभारी कारकून असलेल्या महिलेला अन्य एका महिलेकडून मारहाण करण्यात आली

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरातील तहसील कचेरीच्या पुरवठा शाखेत प्रभारी कारकून असलेल्या महिलेला अन्य एका महिलेकडून मारहाण करण्यात आली आहे. त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज घेऊन आलेल्या महिलेच्या कामास नकार दिल्याच्या रागापोटी ही मारहाण करण्यात आली. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. प्रभारी कारकून राणी लक्ष्मण कोकणे (वय ३०, रा. खराडी, पुणे) यांना मारहाण झाली आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील पुरवठा शाखेत दुपारी हा प्रकार घडला. चेतना सोनवणे (रा. दौंड) या महिलेने एका त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज राणी कोकणे यांच्याकडे आणला होता. त्यावर राणी कोकणे यांनी ज्या व्यक्तीचा अर्ज आहे .

त्यास पाठविण्यास सांगितले असता चेतना सोनवणे हिने टेबलावर आदळआपट करून त्यावरील कागदपत्रे विस्कटली. चेतना सोनवणे हिने कोकणे यांना ` तु लई शहाणपणा करतेस, तुझ्याकडे बघुनच घेते ` , असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर अंगावर धावून जात मारहाण करून चेतना सोनवणे निघून गेली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

राणी कोकणे यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी चेतना सोनवणे हिच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांचे अजिबात नियंत्रण नसल्याने दौंड तहसील कचेरी व प्रशासकीय इमारत मधील अन्य काही शासकीय कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढला असून कनिष्ठांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणार 'वर्क फ्रॉम होम', सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : दहिसरमधील भंगार दुकानाला आग

PMC News : चिंधीचा कचरा प्रकल्प ‘कचऱ्यात’; अर्थसंकल्पात तरतूद करण्यावर बंदी!

T20 World Cup 2026: भारत - पाकिस्तान पुन्हा भिडणार! भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाची अपडेट

Success Story : मेंढपाळ कुटुंबातील गणेश करगळ वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड; थोरांदळे गावाचा अभिमान!

SCROLL FOR NEXT