Women continue to suffer due to errors in the Triple Divorce Act 
पुणे

ट्रिपल तलाक कायद्यातील त्रुटींचा त्रास; 'हलाला' करूनही पतीची पत्नीला पुन्हा नोटीस

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी तिहेरी तलाकवर बंदी आणली. पण त्यामध्ये हलाला करून पुन्हा विवाह करण्यावर व त्यानंतर पुन्हा तलाक करण्यावर कायद्यात प्रतिबंध आणलेला नाही. त्यामुले उच्चशिक्षीत महिलेला प्रचंड त्रास करावा लागत आहे. याविरोधात या महिलेने न्यायालायाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पिडीत महिलेचे पती इंजिनियर असून, त्याने महिलेला तोंडी तलाक दिला होता. त्यानंतर त्यांच्या पतीची समजूत काढण्यात काढून पुन्हा संसार करण्यासाठी दोघांनाही तयार केले. त्यानुसार पिडीत महिलेने हलालाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पूर्वीच्या पतीशी पुन्हा विवाह केला आहे. पिडीत महिलेला आत्तापर्यंत तीन वेळा विवाह करावा लगाला आहे. तरीही या महिलेचा त्रास अद्यापही कमी झालेला नसून, उलट या उच्चशिक्षित पतीने पुन्हा एकदा तलाक देण्यासाठी पिडीत महिलेला पहिली नोटीस दिली आहे.

हलालाची प्रक्रिया
मुस्लीम धर्मातील नियमाप्रमाणे महिलेला इतर पुरुषाशी लग्न करून त्याच्यासोबत तलाक घ्यावा लागतो. त्यानंतरच पहिल्या पतीशी पुन्हा संसार करण्यास परवानगी मिळते.

पिडीत महिला म्हणाली, "मी याविरोधात आवाज उठवू नये यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. शिवाय मला मदत करणाऱ्यांनाही गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

पुणे : पूर्व हवेलीत कोरोनाचे थैमान; उपचारासाठी धावण्याची वेळ​

डॉ. तांबोळी म्हणाले, "केंद्र सरकारने तिहेरी तलाकचा कायदा केला, पण त्यामध्ये केवळ तोंडी तलाक दिल्यास गुन्हा दाखल केला जात आहे. मात्र, हलाला, त्यानंतर विवाह, परत तलाक, बहुपत्नीत्व याबद्दल काहीच तरतूद नाही. त्यामुळे मुस्लीम महिलांचे शोषण सुरू आहे. हा आघोरी प्रकार असून. कोणत्याही प्रकारचा तलाक असला तरी तो न्यायालयीन मार्गानेच झाला पाहिजे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दुसऱ्या लग्नाची परवानगी नसावी.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"लॉकडाऊनच्या कौटूंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. आमचे कार्यालय बंद होते. तरीही या काळात तिहेरी तलाक संदर्भात 11 ते 12 तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. पण यापेक्षा जास्त प्रकार समाजात घडले असण्याची शक्‍यता आहे.''
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT