पुणे

शुभांगी बोबडे व शिल्पा निंबाळकर यांच्या सादरीकरणाने सभागृह मंत्रमुग्ध

CD

महिला सन्मानावरील नृत्याने रंगत

सांस्कृतिक महोत्सवात शुभांगी बोबडे, शिल्पा निंबाळकरांचे सादरीकरण

दहिवडी, ता. ११ : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका शुभांगी बोबडे व शिल्पा निंबाळकर यांनी महिला सन्मानावर आधारित सादर केलेल्या नृत्याने सभागृह मंत्रमुग्ध झाले. या नृत्याने सांस्कृतिक महोत्सवाला रंगत आली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनही भारावल्या.
सातारा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सव सातारा येथे उत्साहात झाला. यामध्ये जिल्हा परिषदेत कार्यरत विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कला गुण सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमात उपक्रमशील शिक्षिका शुभांगी बोबडे व शिल्पा निंबाळकर यांनी भावपूर्ण नृत्य सादर केले. विविध प्रेरणादायी गीतांच्या, तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रतिनिधित्वाची झलक दाखवताना केलेले वेशभूषेतील बदलाने उपस्थितांची मने जिंकली. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनाही या नृत्याने प्रभावित केले. या नृत्याचे सादरीकरण संपताच त्यांनी व्यासपीठावर जाऊन दोन्ही शिक्षिकांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या सोबत फोटो काढून त्यांचे कौतुक केले.
यानिमित्ताने माण तालुक्यातील शिक्षिकांनी आपल्या कलागुणांद्वारे महिला सन्मानाचा प्रभावी संदेश देत जिल्हा परिषद सांस्कृतिक महोत्सवात विशेष छाप पाडली. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व शबनम मुजावर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी विजय गंबरे, केंद्रप्रमुख साधना झणझणे यांच्यासह विविध शिक्षक, पालकांनी विशेष कौतुक केले.
.............
07366
सातारा : शुभांगी बोबडे व शिल्पा निंबाळकर यांनी महिला सन्मानाचा संदेश देणारे नृत्य सादर केल्यानंतर याशनी नागराजन यांनी रंगमंचावर जाऊन दोघींचे अभिनंदन केले. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT