Crime Sakal
पुणे

पुणे : एकोणीस वर्षीय नवविवाहित महिलेचा गळा दाबून खून, पती फरार

धायरी फाटा, वडगाव खुर्द येथे एकोणीस वर्षीय महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

विठ्ठल तांबे

धायरी - वडगाव खुर्द येथील धायरी फाटा परिसरात जानेवारी महिन्यात प्रेम विवाह (Love Marriage) केलेल्या नवविवाहित महिलेचा (Women) मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून, प्रियकर पती अजय पसार झाला आहे.

दिशा अजय निकाळजे (वय १९, वेंकटेश्वरा सोसायटी, धायरी फाटा ,वडगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या तरुण विवाहितीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे उशिरा पर्यंत काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आणि अजय दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. जानेवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होत. त्यांनी प्रेम विवाह केलेला होता. दरम्यान, ते नुकतेच धायरी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय मिळेल ते काम करत होता. दरम्यान आज सायंकाळी दिशा हीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अजय हा पसार झाला आहे. दिशा हिच्या गळ्यावर व्रण आहेत. त्यामुळे तिचा खून झालेला असण्याची दाट शक्यता आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.

दिशा आणि अजय (वय-२३) दोघेही जनता वसाहत परिसरात राहत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम होत. त्यांनी प्रेम विवाह केलेला होता. दरम्यान ते नुकतेच धायरी फाटा वडगाव खुर्द परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय मिळेल ते काम करत होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी दिशा हीचा मृतदेह आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

Shirur Crime : बेकायदेशीरपणे भिशी, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष; वीस कोटींहून अधिक रकमेचा अपहार, तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

SCROLL FOR NEXT