Family-Court sakal
पुणे

कौटुंबिक वाद सुरू असलेल्या महिला होणार आणखी सक्षम

‘स्वयंसिद्धा’ उपक्रम राज्यभर विस्तारणार

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : कौटुंबिक न्यायालयात दावा सुरू असलेल्या महिलांना प्रत्येकवेळी तिच्या सासर किंवा माहेरच्या व्यक्तींकडून मदत मिळतेच असे नाही. त्यामुळे या सर्व लढ्यात त्यांनी सक्षम राहणे गरजेचे असते. त्यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात सुरू करण्यात आलेला ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम आता राज्यभर विस्तारणार आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू असलेल्या राज्यभरातील महिला आणखी सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. (Pune News)

कौटुंबिक आधार गमावलेल्या किंवा आर्थिक निराधार असलेल्या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ साली येथील कौटुंबिक न्यायालयात या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यातून आत्तापर्यंत ५६ महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. त्यातील १७ महिलांना नोकरीद्वारे रोजगार मिळाला आहे. तर विविध कौशल्य शिकत १५ महिलांनी घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे रोजगार किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्याने दावा दाखल असलेल्या महिलांची आर्थिक चणचण कमी झाली आहे. त्यामुळे पुण्यात यशस्वी झालेला हा उपक्रम आता राज्यभर राबविण्यात येणार असून अनेक गरजू महिलांना त्यांचा फायदा होणार आहे. त्याबाबतचे नियोजन येथील कौटुंबिक न्यायालयाने केले आहे.

माझा घटस्फोटाचा दावा दाखल होता. सुनावणी काळात मला पती स्वतः च्या देखभालीसाठी पैसे देत नसत. माझ्या माहेरची स्थिती चांगली नसल्याने त्यांच्याकडे देखील मदत मागता येत नव्हती. त्यामुळे माझी आर्थिक कोंडी झाली होती. तेव्हा मला स्वयंसिद्धा बद्दल समजले. पण शिक्षण नसल्याने नोकरी मिळत अवघड होते. त्यामुळे मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला. त्यासाठी लागणारी मदत स्वयंसिद्धाच्या माध्यमातून काही संस्थांना केली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या व्यवसाय करीत असून आता माझ्या आर्इ वडिलांना देखील मी सांभाळ करण्यात मी मदत करीत आहे.

- स्वयंसिद्धाद्वारे प्रशिक्षण घेतलेली महिला

बुलेट्‌स :

  1. - मार्च २०१७ साली सुरू झाला उपक्रम

  2. - प्रशिक्षण घेतलेल्या महिला : ५६

  3. - नोकरी मिळालेल्या स्वयंसिद्धा : १७

  4. - व्यावसायिक झालेल्या महिला : १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT