पुणे

महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

CD

वडगाव मावळ, ता. १० : जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वडगाव शहरातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरपंचायत व विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता ढोरे, उपसभापती पूनम भोसले, वैशाली सोनवणे, माया चव्हाण, गणेश म्हाळसकर, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, राणी म्हाळसकर, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, रूपाली ढोरे, नगरसेवक विशाल वहिले, अजय भवार, अनंता कुडे, पंढरीनाथ ढोरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरातील खेळाडू हर्षदा दुबे, रुचिका ढोरे, हर्षदा गरुड, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. स्मिता पालवे यांच्यासह आशासेविका, महिला सफाई कर्मचारी तसेच नगरपंचायतमध्ये कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य तपासणी शिबिराचे उद्‍घाटन नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. स्मिता पालवे, डॉ. विकास जाधवर आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये ईसीजी, हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, एक्स-रे, डोळे, कान, नाक, घसा, रक्त इत्यादी तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेकरिता कॅल्शिअम आणि आयर्न फॉलीक टॅबलेटल्स देण्यात आल्या. नागरिकांना शासनाकडून अनेक हितकारक शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ५० स्त्रियांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. शिबिराचा लाभ शहरातील १८० पेक्षा जास्त महिलांनी घेतला. यावेळी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुनीता ढोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यालय अधीक्षक मनिषा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT