पुणे

कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती योजना सुरू ठेवा

CD

पिंपरी, ता. ७ : ‘‘नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि इतर कल्याणकारी योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या योजना पूर्ववत सुरू ठेवाव्यात,’’ अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली. या संदर्भात मुंबई येथे त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांच्या पाल्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. याबाबत काशिनाख नखाते यांनी निवेदन दिले आहे. राज्यातील लाखो बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत होती. तसेच गृहअनुदान, गृहकर्जावरील व्याज अनुदान, मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य अशा अनेक योजना कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत होत्या. मात्र, या योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड आणि विजय कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT