pune sakal
पुणे

कसरत! अंतर्गत रस्त्याची दुरवस्था

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात होतात. या अपघातांना जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सुषमा पाटील.

रामवाडी : चंदननगर ,खराडी, वडगावशेरी ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करणे आवश्यक असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात होतात .या अपघातांना जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

चंदननगर गणेशनगर सह अन्य भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याला दूरवर तडे गेलेले आहेत. काही रस्त्याची पातळी समांतर नसून वर खाली झालेली आहे. रस्ता समांतर ऐवजी एकाच ठिकाणी डांबरीकरणचा ढीग टाकल्याने छोट्या टेकड्या वरुन दुचाकी घेऊन जावे लागत असल्याने गाडी आदळून गाडीचे नुकसान होत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत लवकरात लवकर या भागातील रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण केले जावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास जगताप यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही

जलवाहिन्यांच्या कामांसाठी तर कधी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात पण रस्त्याची दुरुस्ती लगेच केली जात नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना चालताना त्रास होतो. प्रत्येक महिन्याला लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या वॉर्डात जाऊन नागरिकांची समस्या जाणून घेतली पाहिजे.

-दत्तात्रय यादव. जेष्ठ नागरिक - स्थानिक रहिवासी

अनेक ठिकाणी चेंबर खचलेली आहेत. रस्त्यावर खड्डे पडले त्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी करून डांबरीकरण केले पण रस्त्याची समांतर पातळी नसल्याने दुचाकी आदळली जाते त्यामुळे कित्येकांना मानदुखी पाठदुखी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

-सतिश लोणकर, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT