Sunday Science School
Sunday Science School Sakal
पुणे

‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने कार्यशाळांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सुट्टीमध्ये (Holiday) विद्यार्थ्यांच्या (Student) बुद्धीला चालना मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या (Sunday Science School) वतीने चार दिवसीय मोटार विज्ञान आणि रोबोटिक्स या दोन स्वतंत्र कार्यशाळांचे (Workshop) आयोजन केले आहे. चार दिवसीय ‘मोटर : कार्य व उपयोजन’ या कोर्समध्ये विद्यार्थी चुंबकाचे गुणधर्म, विद्युत चुंबक, डी. सी. मोटारीचे कार्य समजून घेऊन मोटार तयार करतील. मोटारींचे महत्त्व समजण्यासाठी विद्यार्थी स्वत: छोटा वर्किंग मिक्सर, रोप-वे, फॅन आणि विद्युत जनित्र आदी मॉडेल्स दिलेल्या साहित्यातून तयार करतील. (Workshops organized by Sunday Science School)

यासोबतच चार दिवसीय रोबोट कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये रोबोटचे तंत्र, प्रकार व उपयोजन आदी संकल्पना समजून घेऊन रोबोट्स बनवतील. या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थी मोटारीच्या मदतीने चालणारा बगबोट, चित्र काढणारा ड्राबोट, सूर्याच्या ऊर्जेवर चालणारा क्रोकबोट आणि आवाजाचा इलेक्ट्रॉनिक सेन्सर असणारा क्लॅपबोट असे चार रोबोट तयार करणार आहेत.

दोन्ही कोर्सेस स्वतंत्र असून विद्यार्थी दोन्ही किंवा कोणत्याही एका कोर्सला नाव नोंदवू शकतात. २३ ते ३१ मे दरम्यान हा उपक्रम होणार आहे. यामध्ये चार प्रयोगसंच कुरिअरने मुलांना घरपोच मिळणार आहेत. व्हिडिओ व ऑनलाइन पद्धतीने या प्रयोगांची माहिती दिली जाईल व घरातूनच पालकांच्या मदतीने मुले हे प्रयोग करतील. सर्वांना डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे.

  • प्रवेश - पहिली ते आठवी विद्यार्थी

  • घरपोच साहित्यासह शुल्क - मोटर कोर्स ९५० रुपये व रोबोट कोर्स १८५० रुपये

  • प्रवेशाची अंतिम तारीख - १६ मे २०२१

  • कोर्स सुरू होण्याची तारीख - २३ मे २०२१

  • नावनोंदणीसाठी फोन अथवा व्हाट्सॲप - ८७७९६७८७०९, ९८५००४७९३३, ९३७३०३५३६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT