World Agri Tourism Day Sakal
पुणे

पुणे: गावच्या मातीची ओढ अन् त्याला व्यवसायाची जोड

जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष : तोट्यातील शेती व्यवसायाला उभारीची संधी

नीलेश शेंडे

पुणे: ओढ लावती अशी जिवाला... गावाकडची माती... एका गीतातील या ओळी शहरातील नागरिकांची गावाकडे असणारी ओढ दर्शवितात. त्यातूनच गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजली आहे. आज अनेक शेतकरी कुटुंबे या व्यवसायात आली आहेत. त्यात उच्च शिक्षित तरुणांचाही मोठा सहभाग आहे.

सर्जा-राजाच्या घुंगराच्या नादात बैलगाडीतून फेरी मारायची, गाई-वासरांशी खेळायचं, नदीत, विहिरीत किंवा शेततळ्यात मनसोक्त डुंबायचं. एखाद्या झाडाखाली बसकण मांडून मस्त हुरडा पार्टी रंगवायची. शेतातल्या ज्वारी-बाजरीच्या कणसाशी खेळायचं, या संकल्पना शहरी भागातील नागरिकांना कृषी पर्यटन केंद्रांकडे आकर्षित करत आहेत. त्यालाच सेंद्रिय शेतीची जोड दिली जात आहे. अशा शेतमालाची खरेदीही ग्राहक या केंद्रांतून करत आहेत. त्यामुळे शेती परवडत नाही, याला उत्तर मिळत आहे. त्यातूनच कृषी पर्यटन वाढत आहे. एकेकाळी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जात होते. आता कृषी पर्यटनातून या संधी मोठ्या असल्याचे दिसत आहे.

कृषी पर्यटन व्यवसायाची फार मोठी संधी राज्यात आहे. त्यामुळे राज्यात कृषी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. या व्यवसायातून राज्यातील पर्यटनास चालना मिळू शकते. तसेच, तोट्यात असलेल्या शेती व्यवसायाला उभारीची मोठी संधी आहे. या ठिकाणांमधून कृषी उत्पादनांना थेट ग्राहक उपलब्ध होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे जतन या माध्यमातून होत आहे. शहरी नागरिकांची ग्रामीण भागाशी नाळ जोडण्याचा हा मुख्य दुवा होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना आणि तरुणांना या व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

पदवीधर ६९%

सातवीपर्यंत ३०%

उच्चशिक्षित १%

राज्यातील कृषी पर्यटन केंद्र ७३९

नोंदणीसाठीआलेले अर्ज

३५०

शासनाकडे नोंद

झालेली केंद्रे

४५०

सध्या सुरू असलेली केंद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT