पुणे

पुन्हा हिरव्यागार उत्सवाकडे वळूया!

श्री श्री रविशंकर

लोकांच्या मनात पर्यावरणासंबंधीचे भान फक्त शिक्षणाद्वारेच येऊ शकते आणि हे शिक्षण एक मोठे उद्दिष्ट आणि निसर्गावरील श्रद्धेतूनच होते. प्राचीन शास्त्रांमध्ये पर्यावरणासंबंधीचे भान मनुष्याच्या संवेदनेमध्येच समाविष्ट केले होते. त्यानुसार पर्यावरण हा मानवाच्या अनुभवाचा पहिला स्तर आहे. पर्यावरण स्वच्छ आणि सकारात्मक असल्यास त्याचा अस्तित्वाच्या दुसऱ्या स्तरांवरही सुयोग्य परिणाम होतो. पर्यावरण आणि मानवी मनामध्ये पूर्वीपासूनच एक संवेदनशील संबंध जोडला गेला होता. आपण आपल्या चेतनेपासून दूर जाऊ लागलो आणि आपले निसर्गाबरोबरचे संबंध तुटले, तेव्हापासूनच आपण पर्यावरण प्रदूषित आणि नष्ट करणे सुरू केले.

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याचा आदर केला गेला आहे. पर्वत, नद्या, झाडे, सूर्य-चंद्र आणि पंचतत्त्वे या सर्वांची पूजा केली गेली आहे. खरेतर जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे निसर्गाबद्दल आदरभाव दिसून येतो. आज मानवी मनाला तणावमुक्त करून, लोभापासून दूर सारून हा श्रद्धाभाव परत आणण्याची गरज आहे. 

आम्ही केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले, की ध्यान पद्धती आणि पर्यावरण कार्यक्रमाच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये एक आंतरसंबंध आहे. या प्रयत्नांचा उद्देश पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग मिळविणे आणि पर्यावरणाबद्दलच्या त्यांची जाणीव व व्यवहारांमध्ये बदल करणे आहे.

संयुक्त राष्ट्रांचे या वर्षीचे पर्यावरण दिनाचे ब्रीद आहे ‘वायुप्रदूषण’. पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. आपण या पाच तत्त्वांचे प्रदूषण वेगवेगळे पाहू शकत नाही. प्लॅस्टिकचा एक तुकडा जाळल्यास तो भूमिक्षरण करतोच, पण वायुप्रदूषणही करतो. त्याचप्रमाणे पाण्यात टाकलेले प्लॅस्टिक पाण्याला प्रदूषित करते व पावसाद्वारे पाण्याला पुन्हा अधिक प्रदूषित करते. कचरा जाळून होणारे वायुप्रदूषण ही सर्वांत मोठी समस्या आहे. प्रत्येक वर्षी शरद ऋतूत शेतात नांगरणी केली जाते, त्या वेळी उगवलेले तण व काडीकचरा जाळण्यात येतो. यातून होणारे प्रदूषण थांबविले पाहिजे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’द्वारे आम्ही शेतकऱ्यांना या तणांचा फेरवापर करण्याचा सल्ला देतो. या तणांचा शेतात पुन्हा वापर करण्याचे तंत्रही आम्ही त्यांना शिकवतो. 

आपली निवड शक्‍य तेथे ‘हिरवीगार’ असली पाहिजे. उदा. कमीत कमी कार्बनचे उत्सर्जन होणारी मोटार विकत घ्या. दुसरा मुद्दा फटाक्‍यांचा आहे. संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण अमेरिका, भारतात नववर्ष आणि दिवाळीसारखे उत्सव फटाक्‍यांच्या आतषबाजीशिवाय साजरे होत नाहीत. भारतात दरवर्षी प्रदूषित हवेमुळे दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांत श्‍वास घेणेही अशक्‍य होते व अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाला फटाक्‍यांवर बंदी घालावी लागली आणि ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडविण्याच्या वेळांवर बंधने आणावी लागली. आपल्याला ही सर्व रोषणाई इलेक्‍ट्रॉनिक किंवा लेसर किरणांद्वारे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण आपले स्वयंपाकघर विजेवर किंवा सौरऊर्जेवर चालवू शकतो, तर रोषणाईला धूरमुक्त करण्याचे प्रयत्न का करू शकत नाही? पर्यावरण प्रदूषित न करताही उत्सव साजरा होऊ शकतो. विवाह किंवा वाढदिवसाला फटाके उडविण्याचे प्रस्थही थांबायला हवे. तरुण वर्गाने सांगितले पाहिजे, की माझ्या वाढदिवसाला किंवा लग्नसमारंभाला आतषबाजी नको. प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक कारखान्यांना मोठा दंड आकारावा किंवा ते बंद केले पाहिजेत.

प्राचीन काळापासून आयुर्वेदाने सांगितले आहे की, काही विशिष्ट वनस्पती जाळण्याने होणारा धूर उत्तम असतो. तो हानिकारक विषाणूंपासून पर्यावरणाचे रक्षण करतो. कडुलिंबाची पाने जाळण्याने होणारा धूर विषाणूविरोधी आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतो. 

पर्यावरणाविषयी संवेदनशीलतेतून मानवामध्ये त्याच्या अस्तित्वाबद्दल जागरूकता निर्माण होते व या जागरूकतेसाठी अध्यात्माचा चांगला उपयोग होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT