Dr. Anil Kakodkar sakal
पुणे

Pune News : जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही - ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

विकसित देशांनी अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली आहे. मात्र जर जगातील विषमता कमी करायची असेल तर सर्वांना समान उर्जा मिळणे गरजेचे आहे.

सम्राट कदम

पुणे - विकसित देशांनी अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली आहे. मात्र जर जगातील विषमता कमी करायची असेल तर सर्वांना समान उर्जा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन अणुऊर्जा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात ‘क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग’ या प्रदर्शनाचे आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहाचे उद्धाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते.

यावेळी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितिन करमरकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राचे समन्वयक डॉ. राजेंद्र देवपूरकर आदी उपस्थित होते.

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘अणुशक्तीचा शोध लागला तेव्हा त्यांची ओळख विध्वंसक शक्ती म्हणून होती. मात्र याचा उपयोग वीजनिर्मिती, शेती, कॅन्सरचा उपचार यांसारख्या लोकहीताच्या कामांसाठीही होत असतो. अणुशक्तीमुळे विकसित जग आणि विकसनशील-मागास जग अशी जगाची विभागणी झाली आहे.

त्यामुळे जगात विषमता वाढली आहे. ही विषमता नष्ट करायची असेल तर नागरिकांचे राहणीमान सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी परदेशात उपलब्ध असलेली उर्जा आपल्याला मिळणे आवश्यक आहे.’

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राच्या स्थापनेमागील संकल्पना समजावून सांगितली. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र देवपूरकर यांनी तर सुत्रसंचालन मृदृला कर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT