admission
admission 
पुणे

अकरावी प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, वाचा कशी असेल प्रक्रिया

मीनाक्षी गुरव

पुणे - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या २६ जुलैपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी उशीरा जाहीर करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.

सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
२२ जुलैपर्यंत - उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे : मुख्याध्यापक/ प्राचार्य

२४ जुलैपर्यंत - उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित/ व्हेरिफाय करणे : विभागीय शिक्षण उपसंचालक

२६ जुलैपासून - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज भाग - एक भरणे आणि अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा/ मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे :  विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने

२७ जुलैपासून - विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग- एक तपासून व्हेरिफाय करणे (आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधणे) : संबंधित शाळा/ मार्गदर्शन केंद्र

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन (प्रवेशासाठी पसंतीक्रम) नोंदविणे व सबमिट / लॉक करणे (नवीन अर्ज भाग -एक सुध्दा भरता येईल) : कालावधी राज्य मंडळाचा दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येईल : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने

अर्ज भरण्याचा करा सराव
विद्यार्थ्यांना मूळ अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये, अर्ज भरण्याचा सराव व्हावा, मुळ अर्ज भरताना चुका होऊ नयेत, यासाठी सराव अर्ज भरण्याची सोय उपल5 करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप संकेतस्थळावर सुविधा देण्यात येत आहे. त्यात भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी १६ जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत संकेतस्थळावर Mock.Demo.Registration तपासा. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT