पुणे

कऱ्हाडच्या विकासकामांसाठी निधी द्या

CD

यशवंतरावांच्या समाधिस्थळ
नूतनीकरणास निधीची मागणी

नगराध्यक्ष यादवांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

कऱ्हाड, ता. १५ ः ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थळाच्या नूतनीकरणासह त्याचे पुरापासून संरक्षण व्हावे, यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी निधी द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांनाही निधी देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला.

उपमुख्यमंत्री शिंदे हे दरे येथे आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष यादव यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले, की ४० वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाचे नूतनीकरण व मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. कृष्णा-कोयना नद्यांना पूर आल्यास पाणी समाधी परिसरात शिरत असल्याने वास्तू धोक्यात आली आहे. तातडीने विशेष निधी मंजूर करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी शहरासाठी दिलेल्या सुमारे तीनशे कोटींच्या निधीतील कामांची माहिती नगराध्यक्ष यादव यांनी दिली. निवेदनातील विकासकामांसाठी लवकरात लवकर भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. पालिकेने नियोजित व प्रस्तावित विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यामुळे ते काम मार्गी लावण्यासाठी श्री. यादव पाठपुरावा करत आहेत.


.............
या आहेत मागण्या

- ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधी परिसराच्या रक्षणासाठी ॲम्पिथिएटर
- ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स, लगतच्या भुईकोट किल्ल्याचे जतन
- परिसराचे पुरापासून संरक्षणासाठी निधी
- शहरात फेज टू अंतर्गत विविध विकासकामांनाही निधी
- रस्ता कारपेट, अस्तित्वातील बगीचांचा विकास, नवीन बगीचा निर्मितीसाठी निधी
- पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स
- पालिकेला सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्यासाठी निधी

W65878
दरे ः एकनाथ शिंदे यांच्याकडे कऱ्हाड शहरातील कामांच्या मागण्यांचे निवेदन देऊन राजेंद्रसिंह यादव यांनी चर्चा केली.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, वाहनचालक धडक देऊन पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

SCROLL FOR NEXT