Yasmin Shaikh sakal
पुणे

Yasmin Shaikh : व्याकरण विदुषीची ‘शतकी’ खेळी;यास्मिन शेख यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण

भाषाशास्त्र आणि व्याकरण विषयांना आयुष्य वाहून घेतलेल्या निष्ठावंत ज्ञानसाधक, ज्येष्ठ व्याकरण विदुषी प्रा. यास्मिन शेख यांनी शुक्रवारी वयाच्या शंभरीत पदार्पण केले. गेल्या ७५ वर्षांपासून व्याकरण हाच ध्यास घेतलेल्या शेख यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर सुहृदांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाषाशास्त्र आणि व्याकरण विषयांना आयुष्य वाहून घेतलेल्या निष्ठावंत ज्ञानसाधक, ज्येष्ठ व्याकरण विदुषी प्रा. यास्मिन शेख यांनी शुक्रवारी वयाच्या शंभरीत पदार्पण केले. गेल्या ७५ वर्षांपासून व्याकरण हाच ध्यास घेतलेल्या शेख यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर सुहृदांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘‘भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. मातृभाषेवर माझे नितांत प्रेम आहे. गेली अनेक वर्षे मी तिची मनापासून सेवा करते आहे, यापुढेही करत राहीन. भाषा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे, हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे,’’ अशी भावना शेख यांनी वाढदिवशी व्यक्त केली. ‘‘मराठी भाषा प्राचीन आहे, त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा,’’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्त शेख यांच्या कन्या डॉ. शमा भागवत आणि रूमा बावीकर यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ‘यास्मिन शेख-मूर्तिमंत मराठीप्रेम’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांनी ग्रंथाचे संपादन केले असून, प्रा. दिलीप फलटणकर यांनी सहसंपादन केले आहे.

ज्येष्ठ लेखक व प्राध्यापक प्रा. प्र. ना. परांजपे, अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड, ज्येष्ठ लेखिका-समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. माधवी वैद्य, मेघना पेठे, स्नेहा अवसरीकर, ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर, रविप्रकाश कुलकर्णी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, शैलजा मोळक, ‘एलआयसी’चे ज्येष्ठ अधिकारी शशी पाटील, अमोल जगताप, आनंद कटके आदी सुहृदांनी शेख यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : हत्तीण परत आणण्यासाठी सरकार सकारात्मक

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT