Uncleaned Water sakal
पुणे

Yerawada News : येरवडा येथील शांतीनगर भागामध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा; संतप्त महिला झाल्या आक्रमक

येरवडा येथील शांतीनगर भागामध्ये गेले अनेक दिवस अशुद्ध, गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिणे नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - येरवडा येथील शांतीनगर भागामध्ये गेले अनेक दिवस अशुद्ध, गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिणे नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे परिसरातील महिला संतप्त झाल्या असून आक्रमक झाल्या आहेत.

शांतीनगर येथे मध्यंतरी सुमारे एक वर्षपूर्ती दुरुस्ती करूनही फारसा फरक पडला नाही. काही दिवसांनी पुन्हा गढूळ पाणी येऊ लागले. याबाबत जया पाटील म्हणाल्या की नागरिकांना पिण्याच्या पाण्यामध्ये गांडूळ, किडे, गाळ येत आहे.

स्थानिक नागरिक म्हणत आहेत की आम्ही जनावर आहे का माणस आहेत जनावर पण असं अशुद्ध पाणी पिणार नाहीत एवढं खराब पाणी आहे. अनेक नागरिकांना त्वचा रोग झाले आहेत, असे येथील महिलांनी सांगितले. उषा झेंडे, वेरोनिका पिल्ले, रुक्मिणी पाटील, अंजलिना अरिकस्वामी, गीता गिरी, लव्हलिना नायडू व अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.

येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले म्हणले की गढूळ पाण्यामुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक व महिला संतप्त झाल्या आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण झालं नाही, तर आंदोलन करू, असा इशाराही यांनी दिला आहे.

यासंदर्भात उपअभियंता रवींद्र पाडळे म्हणाले की, या भागातील जलवाहिनी बरीच जुनी आहे.त्यामुळे तातडीने नवी जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा केला जाईल. या दृष्टीने कार्यवाही सुरू करून साधारण तीन ते चार दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT