yoga 
पुणे

अरे वा, लॉकडाउनमध्ये भिक्षेकऱ्यांना योग विद्येचे धडे 

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : लॉकडाउनमुळे येथील बेघर, भिक्षेकरी व उपासमारीची वेळ आलेल्या सुमारे 72 जणांना पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयात निवारा मिळाला आहे. त्यांच्या दररोजच्या भोजनाची सोयही केली. त्याचबरोबर योग शिकवून त्यांचे स्वच्छतेसह शारीरिक व मानसिक वृद्धीसाठी समुपदेशन केले जाते. त्यामुळे बेघरांच्या जीवनात परिवर्तन झाले असून, त्यांचे आरोग्य व राहणीमान सुधारले आहे. 

जेजुरी (ता. पुरंदर) येथील सुवर्णस्टार सोशल क्‍लब, उघडा मारुती मंडळ, जय मल्हार फाउंडेशन, श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने यांना दररोज नाष्टा व दोन वेळचे जेवण दिले जाते. त्यामुळे वेळेवर जेवणाची सोय झाली. पुरंदर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने त्यांना कपड्यांसह टॉवेल, आरसा, कंगवा, नेलकटर व अंर्तवस्त्र दिली आहेत. प्रियदर्शिनी महिला पतसंस्था व जयाद्री विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने सॅनिटायझर, टूथपेस्ट, साबण पुरविण्यात आले. 

बेघर व भिक्षेकरांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागाव्यात, यासाठी गेल्या महिनाभरापासून त्यांना दररोज आरोग्यविषयक समुपदेशन केले जाते. एक कुटुंब सोडले; तर सर्वजण एकटेच आहेत. मिळेल तेथे काम व सापडेल तेथे मुक्काम, असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्यामुळे आरोग्याबाबत विचार करणे तर दूरच होते. मात्र, अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने या 72 जणांमध्ये परिवर्तन घडवून आणले जात आहे. 

शारीरिक व मासिक वृद्धीसाठी समुपदेशन 
शाळेची बाग स्वच्छ करून त्यांना पाणी देणे, दररोज अंघोळ करणे, ओळीत चहा, नाष्टा व जेवण घेणे, अशा सवयी त्यांना लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते शंकर गावडे यांच्यामार्फत दररोज त्यांना योगासनाचे धडे दिले जात असल्याचे जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT