Property Card
Property Card Sakal
पुणे

घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड

उमेश शेळेके

पुणे - पुणे शहरात (Pune City) तुम्ही एखादी मिळकत खरेदी केली... अथवा हक्कसोडपत्र किंवा बक्षीसपत्र केले... तर प्रॉपर्टी कार्डवर (Property Card) त्यांची नोंद करण्यासाठी आता तुम्हाला सिटी सर्व्हे कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. दस्त रजिस्टर कार्यालयात (Register Office) तिन्हीपैकी कोणतीही दस्त नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइन (Online) सिटी सर्व्हे कार्यालयात होणार आहे. कोणतीही हरकत आली नाही, तर १५ दिवसांत त्यांची नोंद घेतली जाणार असून घरबसल्या डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना मिळणार आहे.

ग्रामीण भागात दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सातबारा आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या ई-फेरफार योजनेत आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात सहा जिल्ह्यात ही योजना भूमी अभिलेख कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश केला आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ १५ दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जाणार आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने हीच नोंद करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत होता.

भूमी अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार योजना सुरू केली. परंतु राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. अशा शहरांमधील मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्रॉपर्टी कार्डावर नोंद घेण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत. त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यातून गैरप्रकारांनाही चालना मिळत होती. या पार्श्‍वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी एनआयसी मार्फत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

हरकतींसाठी १५ दिवस

या संगणकीय प्रणालीनुसार प्रॉपर्टी कार्डवरील मिळकतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइनने भूमि अभिलेख कार्यालयाला मिळणार आहे. त्यानंतर त्याची छाननी होऊन लगेचच टिपण्णी होणार आहे. टिपण्णी मंजूर नोटीस तयार करून ती ज्यांचा मेल आयडी असेल त्यांना ई-मेलने आणि ज्यांचे पत्ते असतील, त्यांना टपालाने पाठविणार आहे. ही सर्व प्रकिया ऑनलाइन आणि एकाच दिवसात होणार आहे. यातील पुढील टप्पा म्हणजे नोटीसवर हरकत देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देणार आहे. हरकत दाखल न झाल्यास प्रॉपर्टी कार्डवरील ई-फेरफार ऑनलाइन तयार होणार आहे. त्यानंतर नागरीकांना तो ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यानंतर १३५ रुपये ऑनलाइन भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड घरबसल्या मिळणार आहे.

काय होणार फायदे ?

१) नागरिकांना मालकीहक्काचा कायमस्वरूपी पुरावा होणार

२) एकच सदनिका अनेकांना विकण्याच्या प्रकारांना आळा बसणार

३) मिळकतीवर कर्ज घेणे सुलभ होणार

४) मिळकतीची विक्री करताना अडचणी दूर होणार

५) खरेदी-विक्रीतील फसवणूक टळणार

नवीन सदनिकाधारकांसाठी...

दहा सदनिकांच्यावर असलेल्या सोसायट्याचे डिम कन्व्हेन्स झाले असेल, तर अशा सोसायट्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे. मात्र, त्या प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव येणार आहे, तर डीड ऑफ डिक्लेरेन्स झाल्यानंतर अपार्टमेंटचे नाव प्रॉपटी कार्ड येणार आहे.

कार्यालयात होणारी गर्दी टळणार

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात दर महिन्याला सुमारे नऊशे ते एक हजार अर्ज प्रॉपर्टी कार्डवर नोंदणी अथवा इतर कामांसाठी दाखल होतात. त्यामुळे सिटी सर्व्हे कार्यालयात यामध्ये नागरिकांची वर्दळ वाढते. आता मात्र ऑनलाइन सुविधा दिल्याने कार्यालयात होणारी सर्व गर्दी यामुळे टाळण्यास मदत होणार आहे. digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर हे पाहता येणार आहे.

राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश केला आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

- किशोर तवरेज, उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT