Young man was cheated of one lakh rupees luring him with gift voucher sakal
पुणे

गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक

पाच जणांना अटक : दोन तरुणींचा समावेश

रवींद्र पाटे

नारायणगाव - गिफ्ट व्हाउचर भेट देण्याचा बहाणा करून मढ(ता.जुन्नर) येथील तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सीजन हॉलिडे कंपनीच्या पाच एजंटाना अटक केली आहे. आरोपी मध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहीती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे एजंट अफताफ इरफान पठाण, श्वेता विरेंद्रकुमार जैस्वाल , स्नेहल विरेंद्रकुमार जैस्वाल , संदीप रमेश गुप्ता , विजय चंद्रपाल मेबाती (सर्व राहणार मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी विशाल बबन सस्ते (वय २७,राहणार कोळवाडी, मढ तालुका जुन्नर) यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून आम्ही अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनीचे व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे एजंट आहोत. तुम्हाला आमच्या कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर भेट देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला हॉलिडे तिकिट, गणपतीची चांदीची मूर्ती आणि किचन आर्टिकल आदी भेट देणार आहोत.असे सांगून विशाल सस्ते यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये रोख व साठ हजार रुपये क्रेडिट कार्ड द्वारे असे एक लाख घेतले. त्या नंतर सांगितले प्रमाणे त्यांना कोणतीही सुविधा दिली नाही.या बाबत विशाल सस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी आरोपींना येथील हॉटेल टकसन येथून ताब्यात घेऊन अटक केली.

मोबाईलद्वारे संपर्क साधून आरोपी गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून हॉटेल ,लॉज मध्ये मुलाखतीसाठी बोलवत असत. त्या नंतर हॉलिडे तिकिट, गणपतीची चांदीची मूर्ती देण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक करत आहेत.या प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क साधावा.

- पृथ्वीराज ताटे, (सहायक पोलीस निरीक्षक, नारायणगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT