youth arrested for stealing students laptops warje malwadi pune Sakal
पुणे

Pune Crime News : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला अटक

वारजे माळवाडी आणि सिंहगड रस्ता भागातील वसतिगृहामधून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरी करणाऱ्या तरुणाला वारजे पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून नऊ लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वारजे माळवाडी आणि सिंहगड रस्ता भागातील वसतिगृहामधून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरी करणाऱ्या तरुणाला वारजे पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून नऊ लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे.

तेजस दत्तात्रेय सूर्यवंशी (वय २३, रा. मगनपुरा, नवा मोंढा, जि. नांदेड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस एक वर्षापासून पुण्यात ‘डीएमएलटी’ अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. शिवाय, तो घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता.

वसतिगृहातील मुले बाहेर गेल्यानंतर तो लॅपटॉप चोरी करीत होता. वारजे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT