Ganesh-Shinde
Ganesh-Shinde 
पुणे

मासेमारी करताना बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मंचर - महिनाभरापासून अपघातात गंभीर जखमी असलेल्या महेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २५) या भावाच्या उपचारासाठी घरच्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या तलावात मासेमारी करीत असताना गणेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २८, रा. कळंब, ता. आंबेगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता. २३) रात्री ही घटना घडली. 

या दुर्घटनेमुळे कळंब येथील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश हा पोहण्यामध्ये तरबेज होता. मंचर पोलिसांच्या वतीने गणपती विसर्जनाच्या काळात घोड नदीच्या पात्रात त्याची नेमणूक केली जात असे. तसेच, विहिरीत किंवा पाण्यात बुडालेले मृतदेह शोधून देण्याचे कामदेखील
तो सहजतेने करीत असे. बुधवारी रात्री आवटे महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी गणेशने जाळे टाकले होते. जाळे पाण्याबाहेर काढत असताना त्याचा पाय जाळ्यात अडकून तो पाण्यात पडला.

त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सुधाकर जाधव व एस. बी. मडके यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेशचा मृत्यू व दुसरा मुलगा महेश गेल्या महिन्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहे. शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दुहेरी संकटामुळे राजेंद्र शिंदे यांचे कुटुंब खचून गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT