Covid19_Warrior_Pune 
पुणे

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला असाही येतोय 'हा' तरुण...

सागर कुलकर्णी

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हटलं की त्याच्याजवळ जायलाही लोक घाबरतात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही त्या रुग्णाला दवाखान्यात नेत नाही. परंतु, कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मदतीला धावून येतोय जनता वसाहतीमधला उमदा तरूण निलेश पवार.

जनता वसाहत ही 50 ते 60 हजार लोकसंख्या असलेली मोठी झोपडपट्टी याठिकाणी घरे एकदम एकमेकांना चिकटून आहेत. वर टेकाडावर घरे आहेत. सध्या जनता वसाहतीमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. याठिकाणी महापालिकेला या रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी अडचण येत आहे. घरे अडचणीची असल्यामुळे स्टेचरही नेता येत नाही. अशावेळी माणुसकी जपणारा निलेश पवार हा तरूण वृद्ध पेशंट आणि नागरिकांना आपल्या पाठीवर गाडीजवळ सोडतो आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या दिवशी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्या दिवसापासून निलेश पवार आणि त्याचे वाघजाई मित्र मंडळ अहोरात्र काम करते आहे. कसलाही स्वार्थ न ठेवता निलेश आणि त्यांचे मित्र समाजासाठी भोजन व्यवस्था असो किंवा जनजागृती असो अखंडपणे चालवत आहे. गेली तीन महिन्यांपासून हा तरूण या मदतीला धावून येतोय.

प्रत्येक भागात जाऊन कोरोनासंदर्भात जे काही काम करायचे आहे. तिथे तरूण मुलांना घेऊन तो काम करतो आहे. पुणे महानगरपालिका असो किंवा पोलिस कर्मचारी हेदेखील आपली अडचण निलेशला सांगतात. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले, की एक वयोवृद्ध महिला घरात तापाने फणफणलेली आहे व ती कोरोना विषाणूने पॉझिटिव्ह आहे, असे मनपा आरोग्य विभागाला समजले. परंतु, डोंगरावर बारीक गल्लीतून स्ट्रेचरवर घेऊन जाणे आणि पुन्हा सुरक्षित घेऊन येणे हे अत्यंत जोखमीचे काम हे कसे पूर्ण करायचे हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला होता, ही गोष्ट नागरिकांकडून निलेशला समजली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कोविड योद्ध्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता स्वतः मिळेल ते पीपीई किट घातले आणि उंच डोंगरावर जाऊन त्या 'कोरोना पॉझिटिव्ह' आजीला स्वत:च्या पाठीवर बसवून खाली घेऊन आला. ही महिला पॉझिटिव्ह आहे हे माहीत असताना तिच्यामुळे आपपल्याला लागण होऊ शकते, याची माहिती असताना सुद्धा अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याच्या मूळ स्वभावामुळे निलेश हा धोका सुद्धा पत्करण्यास तयार झाला.

(Edited By : Krupdan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात गुंगीकारक औषधाचे गूढ कायम, SITलाही अद्याप ठोस धागा नाही

SCROLL FOR NEXT