Drown
Drown 
पुणे

मासे पकडण्यासाठी भिमानदीपात्रात तरुण गेला, पण...

अमर परदेशी

पाटस - कानगाव (ता. दौंड) येथे भिमानदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात बडुन बेपत्ता झाल्याची घटना घडली. भारत पितांबर भालेराव (वय ३५) रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे असे संबधित बेपत्ता तरुणाचे नाव आहे. कानगाव, गार, सोनवडी हद्दीपर्यंत नदीपात्रात त्याचे शोधकार्य सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत पाटस पोलिस ठाण्याचे पोलिस नाइक संतोष मदने यांनी माहीती दिली. मांडवगण येथील भारत पिंताबर भालेराव याचा गवंडी कामाचा व्यवसाय आहे. दोन दिवसापासुन तो कानगाव हद्दीतील भिमा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी येत होता. शुक्रवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता भारत व त्याची पत्नी हे नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेले. त्यावेळी नदीमध्ये पाण्याचा बऱयापैकी प्रवाह सुरु होता. मासे पकडत असताना भारत हा या अचानक पाण्यामध्ये पडला.हे पाहुन त्याच्या पत्नीने आरडा-ओरडा केला. मात्र, काही वेळातच तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. परीसरातील तरुणांनी पाण्यात उडी मारुन त्याचा शोध घेतला.मात्र,तो सापडू शकला नाही. माहीती मिळताच पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.काल पासुन पोलिसांच्या उपस्थीत स्थानिक तरुण व काही ग्रामस्थांच्या मदतीने कानगाव, गार, सोनवडी या नदीपात्रात भारत याचा शोध सुरु आहे. सकाळी महसुल विभागाचे तलाठी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.

दरम्यान, चौवीस तास उलटुन देखील त्याचा तपास लागण्यात यश आले नाही. भारत याची उंची अंदाजे पाच फुट दोन इंच, रंग काळा सावळा आहे. मध्यम बांधा तसेच अंगात टि शर्ट, निळया रंगाची बरमूडा पॅंट आहे. या वर्णनाच्या व्यक्ती विषयी काही माहीती मिळाल्यास मोबाइल क्रमांक : ९३७३२३०५२६ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT