आष्टीत युवा राष्ट्रवादी वक्तृत्व स्पर्धा
आष्टी, ता. २४ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सह्याद्री प्रतिष्ठान, जनपरिवर्तन संस्था आष्टी (ता. मोहोळ) यांच्या संयुक्त विद्यमाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा राष्ट्रवादी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आष्टी पंचायत समितीचे सदस्य डॉ. अमित व्यवहारे, उपसरपंच निखिल गुंड, ज्येष्ठ नेते अशोक साळवी सर, अमर माने, परिक्षक प्रा. सुमित भोसले, प्रा दत्तात्रय चव्हाण, जे. के. आप्पा गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे ४२ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली. प्रथम ः रोहन कवडे (पुणे )मिथुन माने (सातारा ) द्वितीय ः चारूदत्त माळी (गडहिंग्लज) हेमा भोसले (पंढरपूर) तृतीय ः समृद्धी सावंजी (मंगळवेढा) संकेत पाटील (पुणे) उत्तेजनार्थ ः प्रतीक्षा लिमकर (परांडा), समर्थ लोंढे, विराज चव्हाण यांनी पटकावली. तर प्रोत्साहनपर बक्षिसे राधिका व्यवहारे, संग्राम व्यवहारे, तेजस पाटील, निकिता माने, श्रावणी शेवाळे, श्रृतीका सुर्वे, संस्कृती कोळेकर, स्वराली व्यवहारे, साक्षी व्यवहारे, सृष्टी व्यवहारे, राजवीर तळेकर यांना देऊन सन्मानित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.