पुणे

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

CD

फोटो ः झाईद फारूखी
प्राजक्ता नारायणकर

झाईद फारुखी, प्राजक्ता नारायणकरला जेतेपदाचा मान
राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

पुणे, ता. १० ः पाषाणच्या सोमेश्‍वर फाउंडेशन आयोजित विनायकी क्रीडा महोत्सवांतर्गत तिसऱ्या विनायक निम्हण स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष विभागात ठाण्याच्या झाईद फारुखी आणि महिला गटात मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने विजेतेपदाचा मान मिळविला, तर मुंबईच्या प्रशांत मोरे आणि सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने तिसरे स्थान मिळविले.
झेनेटिक स्पोर्ट्‌सच्या सहकार्याने महाराष्ट्र कॅरम संघटना व कॅरम संघटना ऑफ पुणेच्या मान्यतेने पाषाण-सूस रोड सनिज वर्ल्ड येथील अंबर हॉलमध्ये संपलेल्या या स्पर्धेत पुरुष गट एकेरीच्या अंतिम लढतीत ठाण्याच्या झाईद फारुखीने पुण्याच्या सागर वाघमारेचा १७-१२, १६-१२ असा पराभव करून जेतेपदाचा मान मिळविला. त्याआधी उपांत्य फेरीत पुण्याच्या सागर वाघमारेने पुण्याच्याच अभिजित त्रिपणकरला २५-६, २५-१९ असे तर ठाण्याच्या झाईद फारुखीने मुंबईच्या प्रशांत मोरेला १५-२५, २५-२२, २५-१० असे हरविले होते, तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपणकरचा २५-१०, २५-११ असा पराभव करून तिसरे स्थान मिळवले.
महिला गटाच्या एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेचा २३-१९, १७-१४ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपांत्य फेरीत मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर २३-२१, १२-२५, २५-६ असा, तर ठाण्याच्या मधुरा देवळेने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर २५-७, २१-१७ असा विजय मिळविला होता. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमचा २४-१०, १४-२५, २५-१२ असा पराभव करून तिसरा क्रमांक मिळविला होता.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी उद्योजिका मधुरा वाळुंज, ज्येष्ठ राष्ट्रीय विजेते व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सुहास कांबळी, नगरसेवक सनी निम्हण, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर अहमद खान, यतीन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कॅरम संघटना ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर आणि राज्य कॅरम संघटनेचे सहसचिव आणि स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते हे उपस्थित होते.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT