जिल्हा परिषदेत बदल्यांचा ‘मंगळवार’
सात संवर्गांतील २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित बदली प्रक्रियेला मंगळवारपासून सुरवात झाली असून, पहिल्याच दिवशी सात विविध संवर्गांतील २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक संवर्गातील बदल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये २० प्रशासकीय तर ५ विनंती बदल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी एकही आपसी (म्युच्युअल) बदली झाली नाही. सामान्य प्रशासन विभागात सर्वाधिक हालचाली झाल्या असून, कनिष्ठ सहायक संवर्गातील १२ प्रशासकीय व १ विनंती अशा एकूण १३ बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ सहायक संवर्गात २ प्रशासकीय बदल्यांचे आदेश देण्यात आले. महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका संवर्गात ५ प्रशासकीय व १ विनंती अशा एकूण ६ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गात १ विनंती बदली झाली असून, केंद्रप्रमुख संवर्गात १ प्रशासकीय व २ विनंती अशा एकूण ४ बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
ठळक बाबी
एकूण संवर्ग : ७
प्रशासकीय बदल्या : २०
विनंती बदल्या : ५
एकूण बदल्या : २५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.