student
student sakal
पुणे

पुणे : झेडपीचे विद्यार्थी होणार ‘स्कॉलर’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने चालू शैक्षणिक वर्षापासून १० कलमी कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. त्याची येत्या महिन्याभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.

या नव्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शालेय जीवनापासूनच सुधारण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रारूप (मॉडेल) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) विकसित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाबाबत माहिती

३ हजार ६८९

प्राथमिक शाळांची संख्या

११ हजार २४६

जिल्हा परिषदेचे एकूण शिक्षक

६९

आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा

७३२

सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा

२ हजार ८८८

पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा

२ लाख ३६ हजार ७३१

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी

१ लाख २० हजार ९१८

एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या

१ लाख १५ हजार ८१३

एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या

जिल्ह्यातील खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी हा दहाकलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा उपयोग भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी होऊ शकेल.

- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Shirur Lok Sabha: शिरुरमधील मतदाराला मतदानावेळी आली अडचण, थेट शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय झालं होतं?

KL Rahul: जो बुंद से गई वो... प्रेक्षकांसमोर झापल्यानंतर राहुलबरोबर संजीव गोयंकांचे डिनर कोणालाच पचेना

Marathi News Live Update: बेकायदा होर्डिंगविरोधात २४० तक्रारी, पण कारवाई नाही; उदय सामंत यांचा आरोप

SCROLL FOR NEXT