पुणे

पुण्याचे आलाप दोशी यांना ‘मिशिगन विद्यापीठा’चा पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

पुणे : अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘मिशिगन विद्यापीठां’तर्गत कार्यरत असणा-या ‘मिशिगन इंस्टिट्युट फॉर क्लिनिकल ॲन्ड हेल्थ रिसर्च’ या संस्थेच्या “डिझाईन ॲन्ड इनॉव्हेशन’ विभागाचे संचालक आलाप दोशी यांना मिशिगन विद्यापीठातर्फे ‘रायझिंग अल्युमनाय- 2020’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दोशी हे मिशिगन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी “स्कुल ऑफ इंफॉर्मेशन” मधून ‘इंफर्मेशन ॲन्ड ह्युमन कंप्युटर इंटरॲक्शन’ या विषयात २००७ मध्ये पदव्युत्तर (एम.एस.) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मिशिगन इंस्टिट्युट फॉर क्लिनिकल ॲन्ड हेल्थ रिसर्च’मध्ये सुमारे ११ वर्षे ‘लीड ह्युमन-सेंटर्ड डिझायनर’ म्हणून काम पाहिले. २०१९ मध्ये त्यांची, या संस्थेतील “डिझाईन ॲन्ड इनॉव्हेशन’ विभागामध्ये संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. 

दोशी यांनी विविध प्रकारची व्यवसायिक मॉडेल्स, डिजिटल व प्रत्यक्षातील संवादासाठीची उत्पादने (इंटरॲक्टीव्ह प्रॉडक्ट्स), सेवाक्षेत्र, कार्यावकाश व प्रक्रिया (सर्विस, वर्कप्लेस व प्रोसेस) व अनुभविक (एक्सपिरियन्स) डिझायन्स तयार करण्याची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे. कोव्हिड १९ या संक्रमणाबाबत वैद्यकीयक्षेत्राला लाभदायक ठरणारी तसेच या महामारी विषयी जनजागृती करण्यासाठी दोशी यांनी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण डिझाईन्सचा वापर मिशिगन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामार्फत डिजिटल माध्यमातून केला जात आहे. 

यापूर्वीही त्यांना इनॉव्हेशन आणि संशोधनाबाबतचे विद्यापीठीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, भारतातून शिक्षणासाठी अमेरिकेत येणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणा-या इंडियन स्टुडंट्स असोसिएशनचे पदाधिकारी म्हणूनही ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला असून, शालेय शिक्षण लॉयला विद्यालय तर पुढील शिक्षण एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले आहे. त्यांच्या तीन पिढ्या या फर्निचर डिझाईन्स व्यवसायात कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT