harish rawat Sakal
Punjab Assembly Election 2022

पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल - हरीश रावत

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पीटीआय

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

चंडीगड - काँग्रेस पक्षच (Congress Party) समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू शकतो आणि त्यामुळे पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी केला. पीटीआयशी फोनवरून दिलेल्या मुलाखतीत रावत बोलत होते. पंजाबची जनता काँग्रेसच्याच बाजूने असून विरोधात कौल जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान पार पडले असून तेथे ७० पैकी ४० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे.

पंजाबबाबत बोलताना ते म्हणाले, की पंजाबची जनता त्रिशंकू स्थिती निर्माण करणार नाही. पंजाबची जनता नवीन कोणताही प्रयोग स्वीकारणार नाही. काँग्रेसला स्पष्ट आणि निर्भेळ यश मिळेल. काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करेल. गेल्या काही वर्षांपासून आपण पंजाबचे वातावरण अनुभवत आहोत. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल- बसप आघाडी, भाजप आघाडी या पक्षांनी निवडणुकीत जोर लावल्यामुळे राज्यात त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता वर्तविली जात असताना रावत यांनी ती शक्यता फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT