Punjab assembly Election Sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab assembly Election: अस्तित्त्वासाठी भाजपचे प्रयत्न

कृषी कायद्यांना झालेला तीव्र विरोध लक्षात घेता भाजपने पंजाबबाबत सबुरीचे धोरण स्वीकारले होते.

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : कृषी कायद्यांना झालेला तीव्र विरोध लक्षात घेता भाजपने पंजाबबाबत सबुरीचे धोरण स्वीकारले होते. परंतु, आता शेवटच्या टप्प्यात जोर वाढवून अस्तित्वाची लढाई नेटाने लढण्याचे भाजपने नियोजन केले आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभांचे नियोजन भाजपने केले आहे. (Punjab assembly Election Updates BJP)

केंद्राच्या कृषी कायद्यांना पंजाबमधून कडाडून विरोध झाला. त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली. प्रदीर्घ काळ सोबत असलेल्या शिरोमणी अकाली दलानेही भाजपची साथ सोडली. त्यामुळे सत्तारूढ काँग्रेस आणि आम आदमी पार्टीतच सामना होईल, असे सुरुवातीचे चित्र होते. त्यामुळे भाजपला येथे कोणीही खिजगणतीत घेत नव्हते. कृषी कायद्यांना झालेल्या विरोधामुळे यंदा भाजपला येथे फारसे यश मिळणार नाही, असा अंदाज अनेक अभ्यासक, राजकीय पक्षांनी वर्तविला आहे.

विद्यमान विधानसभेतही भाजपचे तीन आमदार असून २०१२ मध्ये मात्र, १२ आमदारांपर्यंत पक्षाने मजल मारली होती. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत भाजपने प्रत्येकी २३ जागा लढविल्या होत्या. मात्र, यंदा दुपटीहून अधिक जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. केंद्रात तसेच शेजारच्या हरियानात भाजपचे सरकार आहे. त्याचा फायदा घेऊन पंजाबमध्ये आपले अस्तित्व टिकविण्याबरोबरच नवी ओळख निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ६७ जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लढवीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT