Punjab Election Sakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Election: मतदारराजासाठी काही पण....केव्हाही !

राज्यात विक्रमी मतांनी विजयी होतील

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा

चंडीगड: न्यायालयात नोकरी हवी, २० तारखेला भेट. दुकानासमोरील अतिक्रमणे दूर करायची आहेत, लगेच फोन करतो, महाविद्यालयात मुलीला ॲडमिशन पाहिजे..मिळवून देतो, दोन दिवसांनी लग्न आहे, नक्की येतो.. मतदारांच्या अशा अनेक मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत उमेदवार त्यांना ‘प्रसन्न’ करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे पंजाब मध्ये मंगळवारी दिसून आले.

पंजाब काँग्रेसमधील हेवीवेट मंत्री बलबीर सिंग सिद्धू हे मोहालीतून तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या निवासस्थानी सकाळी पोहोचल्यावर प्रचाराची धामधूम सुरू असतानाच नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी त्यांनी सकाळी ८ ते १० हा वेळ राखून ठेवला आहे. त्या वेळी त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. आरोग्यमंत्री असताना राज्याच्या सीमा ही माझी चौकट होती, आता उमेदवार असल्यामुळे मोहाली मतदारसंघच माझी चौकट आहे,

असे म्हणत त्यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या राजकारणावर काही बोलण्याचे टाळले. मात्र, लोकसभेचा वापर प्रचारासाठी झाल्याची खंत व्यक्त केली तर, पंजाब हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कारण शेतकरी हे पूर्वीपासूनच काँग्रेससोबत आहेत. ज्यांना (‘आप’च्या लोकांना) शेतीमधील काही कळत नाही, ते कसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रचाराच्या काळातही नागरिकांसाठी वेळ कसा राखून ठेवता, असे विचारल्यावर, त्यांची कळी खुलली अन हेच माझे वैशिष्ट्य आहे, असे सांगत प्रत्येक नागरिकाचे कायमच समाधान करण्याचा प्रयत्न करतो, असा दावा त्यांनी केला. आधार कार्डबद्दलची समस्या, नोकरीमध्ये होत असलेला त्रास, पाणीपट्टीचे वाढीव बिल या बद्दलच्या तक्रारींचे निवारण करतानाच प्रचाराच्या नियोजनाचा आढावा ते घेतात. सकाळचे दहा- सव्वा दहा झाल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागते, तसे ट्रॅकसूटमध्ये असलेले बलबीर कपडे बदलून प्रचारासाठी बाहेर पडतात. यंदाही ते राज्यात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा अंदाज त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करतात. मोहालीचे माजी महापौर कुलवंतसिंग हे त्यांना ‘आप’च्या उमेदवारीवर आव्हान देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT