Rahul Gandhi and Charanjit Singh Channi Rahul Gandhi and Charanjit Singh Channi
Punjab Assembly Election 2022

‘चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील’

सकाळ डिजिटल टीम

लुधियाना : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी लुधियाना येथे एका सभेत पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हे काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असतील. हा माझा नाही तर पंजाबच्या जनतेचा निर्णय आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी, पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू, माजी पीपीसीसी प्रमुख सुनील जाखर आणि एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याशी लुधियाना येथे बंद दाराआड बैठक घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली.

चन्नी जी गरीब घरातील मुलगा आहेत. त्यांना गरिबी समजते. ते गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांच्या हृदयात त्यांच्या रक्तात पंजाब आहे. सिद्धूजींच्या हृदयात व रक्तात पंजाब आहे. त्यांना कापून बघा रक्त बाहेर येईल तेव्हा त्यात पंजाब दिसेल, असेही राहुल गांधी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि दोन प्रमुख दावेदार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि काँग्रेसचे राज्य युनिट प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे एकाच कारमधून प्रवास करताना दिसले. काँग्रेस नेते सुनील कुमार जाखड यांनीही तिघांसोबत राईड शेअर केली.

मला राहुल गांधींचा निर्णय मान्य आहे. मला निर्णय घेण्याची शक्ती दिली तर मी लोकांच्या जीवनातील माफिया नष्ट करेन. मी सुधारणा करेन. सत्ता दिली नाही तर तुम्ही ज्याला मुख्यमंत्री कराल त्याचासोबत हसत हसत चालेन, असे लुधियानामधील व्हर्च्युअल रॅलीदरम्यान पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT