शरद पवार sakal
Punjab Assembly Election 2022

‘...तो महाराष्ट्र भी तैयार है’: शरद पवार

विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, पण हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी गुरुवारी बोलताना व्यक्त केले आहे. भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात आहे यावर पवार यांनी ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा अशी भूमिकाही त्यांनी मांडली. ते म्हणाले, ‘‘पंजाब असे एक राज्य होते, ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे. आम आदमी पक्ष हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले, ज्या पद्धतीने प्रशासन दिले, त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. दिल्लीच्या कामाचा लाभ पंजाबमध्ये ‘आप’ला झाला, असे स्वच्छ दिसते. त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले आहे.’’

किमान समान कार्यक्रमावर चर्चा

शरद पवार म्हणाले, ‘‘देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT