गुंतवणुकीचा चांगला पर्याय
गुंतवणुकीचा चांगला पर्याय Esakal
Investment

PPF ची मॅच्युरिटी वाढवा आणि मिळवा अधिक व्याज, गुंतवणूकीसाठी एक चांगला पर्याय

Kirti Wadkar

अनेकांना गुंतवणूक करताना त्यातून मिळणाऱ्या फायद्यासोबतच ती सुरक्षित असावी याकडे जास्त कल असतो. अशावेळी PPF  म्हणजेच पब्लिक प्राॅव्हिडंट फंड हा एक सुरक्षित पर्याय आहे. Investment Tips Marathi Khow how to get interest from PPF Account

PPF ही केंद्र सरकारची एक बचत योजना Saving Scheme असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखिम किंवा तोटा होण्याचा धोका नाही.  PPF ही एक अशी योजना आहे. ज्यामुळे तुम्ही टॅक्समध्येही बचत करू शकता. PPF चा मॅच्युरिटी पिरियड हा १५ वर्षांचा असतो.

म्हणजेच एकदा गुंतवणूक केल्यानंतर १५ वर्षांनी तुम्ही ती रक्कम काढू शकता. या योजनेत ७.१० टक्के व्याज गुंतवलेल्या रक्कमेवर प्रतिवर्षी मिळतो. 

PPF च्या मॅच्युरिटीचा काळ १५ वर्षांचा असला तरी तुम्ही तुम्हाला हवे असल्यास पुढे देखिल हे खाते सुरू ठेवू शकता. तसचं १५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतरही खातेधारक ५ वर्षांच्या काळासाठी कितीही वेळा मॅच्युरिटीचा काळ वाढवू शकतात. 

जर तुम्हाला पैशांची आवश्यकता नसेल तर गुंतवणूक करून अधिक नफा कमावण्यासाठी म्यॅच्युरिटीनंतरही पीपीएफमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे. 

अशा प्रकारे वाढवा PPF चा कालावधी

PPFच्या म्यॅच्युरिटीनंतरही अवधी वाढवण्यासाठी तुम्हाला Form H जमा करावा लागेल. बँक किंवा पोस्ट ऑफिस जिथे तुम्ही पीपीएफ खातं उघडलं आहे तिथे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल. 

PPF वर जास्त व्याज मिळविण्यासाठी, गुंतवणूकदारांनी दर महिन्याच्या ४ तारखेपूर्वी गुंतवणूक करणं योग्य ठरतं.  यामुळे, गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळतो. 

PPFच्या म्यॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराकडे पर्याय उपलब्ध असतात यातील योग्य पर्याय निवडून नफा मिळवू शकता. 

हे देखिल वाचा-

पूर्ण पैसे काढून घेणं- PPFच्या म्यॅच्युरिटीनंतर तुम्ही यात गुंतवलेला संपूर्ण पैसा व्याजासह काढून घेऊ शकता. अकाउंट क्लोजर वेळी संपूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.  खास गोष्ट म्हणजे म्यॅच्युरिटनंतर व्याजासह मिळालेली संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री असते. 

१५ वर्षांनंतरही करा गुंतवणूक- दुसरा पर्याय म्हणजेच पुढे तुम्ही दर ५ वर्षांसाठी अकाऊंट एक्सटेंड म्हणजेच अवधी वाढवून घेऊ शकता. मात्र यासाठी तुम्हाला मॅच्युरिटीच्या १ वर्ष आधीच अर्ज करावा लागेल. शिवाय मुदतवाढीदरम्यान तुम्ही तुम्ही पैसे काढू शकता. 

बिना गुंतवणूक खातं सुरू ठेवणं- पीपीएफ खात्याचा आणखी एक फायदा म्हणजे मॅच्युरिटीनंतरही तुम्ही खातं सुरू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला पुढे गुंतवणूक करायची नसेल तरी मॅच्युरिटी आपोआप ५ वर्षांसाठी वाढली जाईल. त्यामुळे तुम्हाला एकूण रक्कमेवरील व्याज मिळत राहिल. 

कुठे उघडू शकतो पीपीएफ खातं

कोणत्याही बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं उघडणं शक्य आहे. तुम्ही तुमच्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन  मुलासाठी इतर व्यक्तीच्या मदतीने हे खात उघडता येतं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT