Maruti Suzuki announces major festive season price cuts on cars ahead of Dasara and Diwali celebrations.

 

esakal

Sakal Money

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

Maruti festive season discount News : ऑल्टो K10 पेक्षा आता Maruti S-Presso झाली स्वत; कोणत्या कारच्या किंमतीत आता किती कपात झाली आहे.

Mayur Ratnaparkhe

Maruti Announces Big Price Cut on Cars Before Dasara and Diwali : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूतू सुझुकीने आज आपल्या कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, मारूती वॅगनारपासून ते ऑल्टो आणि इग्निस सारख्या छोट्या कारच्या किंमतींमध्ये जवळपास १.२९ लाख रुपयांपर्यंत कपात केली गेली आहे. कारच्या किंमतीत ही कपात येत्या २२ सप्टेंबर पासून लागू होणार आहे.

मारूती सुझूकीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अशातच झालेल्या जीएसटीमधील सुधारणांचा फायदा ग्राहकांपर्यंत थेट पोहचवला जाईल. ज्याअंतर्गत कंपनीने आपल्या पोर्टफोलिओतील कारच्या किंमतींमध्ये कपातीची घोषणा केली आहे. जाणून घेऊयात आता कोणत्या कारच्या किंमतीत किती कपात केली गेली आहे.

मारुती सुझूकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग अँड सेल्स विभागाचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर पार्थो बॅनर्जी यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले की, कारच्या किंमतींमध्ये कपात, अशातच झालेल्या जीएसटी सुधारणांतर्गत केली गेली आहे. किमतींमध्ये जरी कपात गेली असली, तरी वाहनांमधील सुविधा आणि तंत्रज्ञान इत्यादींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या नव्या किंमतीच्या घोषणेनंतर आता मारूतीची सर्वात लोकप्रिय ऑल्टो K10 ही सर्वात सर्वात स्वत कार राहिलेली नाही. तर आता Maruti S-Presso ही सर्वात स्वस्त कार ठरली आहे. कारण या कारच्या किंमतीत सर्वात जास्त १ लाख २९ हजार ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

याशिवाय मारूती सुझूकीने आपली आणखी एक लोकप्रिय कार स्विफ्टच्या किंमतीत ८४ हजार रुपयांचा कपात जाहीर केली आङे. त्यामुळे आता स्विफ्टची सुरुवातीची किंमत केवळ ५ लाख ७९ हजार रुपये झाली आहे. अशातच स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल कंपनीने लॉन्च केले होते. त्यावेळी या कारची किंमत ६ लाख ४९ हजार रुपये जाहीर करण्यात आली होती.

याशिवाय बलेनोचे दर ८६ हजार १०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत केवळ ५.९९ लाख रुपये झाली आहे. याशिवाय मारूतीची पहिली फाईव्हा स्टार रेटींग मिळवलेल्या डिझायरच्या किंमतीतही कंपनीने कपात केली आहे. या कारच्या किंमतीत ८७ हजार ७०० रुपयांची कपात केली गेली आहे. त्यामुळे आत ही कार ६ लाख २६ हजार रुपयांच्या किंमतीपासून मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Criminal Law: विवाहपूर्व संबंध ठेवणे; सरकारवर टीका करणे गुन्हा ठरणार, नवा कायदा लागू, नव्या तरतुदींमुळे मोठी उलथापालथ

Alandi Accident : विजय स्तंभ मानवंदनेसाठी निघाले; अन् आळंदी-मरकळ रस्त्यावर जीप झाली पलटी; 28 जण जखमी!

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

January Horoscope 2026: जानेवारी महिन्यात कोणत्या राशींवर राहणार रोचक राजयोग? टॅरो कार्ड्सनुसार जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT