number of retail investors holding demat accounts increased of 4.03 crore in a year marathi news  
Sakal Money

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Share Market News: यामध्ये उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची एकूण संख्या वाढून १.८१ कोटी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा



नवी दिल्ली : शेअर बाजारातील तेजी आणणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या (डीमॅट अकाऊंट) एका वर्षात ४.०३ कोटी इतकी (३१.२३ टक्के) वाढली आहे. यातील १.२८ कोटी गुंतवणूकदार बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील आहेत; तर तमिळनाडून, कर्नाटक, केरळ, तेलंगण या राज्यातील गुंतवणूकदारांची संख्या केवळ ५२.१० लाखांनी वाढली आहे.

उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची एकूण संख्या वाढून १.८१ कोटी झाली आहे. यानंतर उत्तर प्रदेश गुंतवणूकदारांच्या संख्येचे महाराष्ट्रानंतरचे दुसरे राज्य बनले आहे. महाराष्ट्रात एकूण ३.१९ कोटी गुंतवणूकदार आहेत, तर गुजरातमध्ये १.६० कोटी गुंतवणूकदार आहेत.

दरम्यान, तीन वर्षांत डीमॅट अकाउंटची संख्या तीनपटीने वाढली आहे. २०२१ मध्ये ही संख्या ५.४४ कोटी होती, ती आता १६.९६ कोटी झाली आहे. पुढील बारा महिन्यांत ही संख्या २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता मेहता इक्विटीजचे डायरेक्टर प्रशांत भन्साली यांनी व्यक्त केली.

गेल्या एक वर्षात सेन्सेक्समध्ये २० टक्के तेजी पाहायला मिळाली. एक वर्षाआधी म्हणजे २८ एप्रिल २०२३ ला सेन्सेक्स ६१,११२ अंकांवर होता. तो आता ७३,७३० अंकांवर पोहोचला आहे. येणाऱ्या काळात यात अधिक वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT