1st April Share Market Opening Esakal
Sakal Money

Share Market Opening: नव्या अर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी, गुंतवणुकदारांचे 'इतके' लाख कोटी वाढले

Sensex-Nifty Today: बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी50, भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांत, सोमवारी सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली.

आशुतोष मसगौंडे

1st April Share Market Opening:

नव्या अर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी50, भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांत, सोमवारी सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली.

BSE सेन्सेक्स सुरुवातीलाच 500 अंकांनी वाढल्याचे पाहायला मिळाला, तर निफ्टी 50 ने 22,500 गाठला.

सकाळी 9:50 वाजता, बीएसई सेन्सेक्स 477 अंकांनी किंवा 0.65% वाढून 74,076.63 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी50 167 अंकांनी किंवा 0.74% वाढून 22,491 वर होता.

गुंतवणुदारांचे 3.65 लाख कोटी रूपये वाढले

मागच्या ट्रेडिंग सेशनला म्हणजेत 28 मार्च 2024 रोजी बीएसई वर लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 3,86,97,099.77 करोड रुपये होते. पण आज म्हणजेच 1 एप्रिल रोजी बाजार उघडताच ते 3,90,62,712.79 वर पोहचले. याचाच अर्थ एका ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणुदारांचे 3.65 लाख कोटी रूपये वाढले.

सेनसेक्सचे 'हे' शेअर्स तेजीत

आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. तर तीन शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये जेएसड्ब्यू स्टील सर्वाधिक 3.01 टक्क्यांनी वाढला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला टाटा स्टील 2.08 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये एचडीएफसी, टाटा मोटर्स आणि एलटी अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

आज नकारात्मक असलेल्या तीन शेअर्समध्ये मारूती, इंडस इंड बँक आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.

कसे होते शेवटचे ट्रेडिंग सेशन?

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्सने 655.04 अंकांची नेत्रदीपक वाढ नोंदवली आणि 53,515.19 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 50 ने 203.25 अंकांची उसळी घेतली आणि 22,326.90 वर बंद झाला.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार गुड फ्रायडे असल्याने बाजार बंद राहिले. अशा स्थितीत गुरुवार हा ट्रेडिंग वीकचा शेवटचा दिवस होता.

या कालावधीत, निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या क्षेत्रांमध्ये बँक, ऑटो, वित्तीय सेवा, एफएमसीजी आणि आयटी शेअर्सचा समावेश होता. याशिवाय, जर आपण क्षेत्रनिहाय पाहिले तर, निफ्टी 50 मध्ये 4 क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT