18 percent growth in automobile motor exports  Sakal
Personal Finance

Automobile Exports Trends : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत मोटार निर्यातीत १८ टक्के वाढ; ‘सियाम’चा अहवाल

SIAM Report : देशांतर्गत बाजारपेठेत १० लाख २६ मोटारींची विक्री झाली, यात केवळ वार्षिक तीन टक्के वाढ नोंदवली गेली, असेही ‘सियाम’ने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रमुख बाजारपेठांमधील मजबूत मागणीमुळे देशातून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत मोटार निर्यातीत वार्षिक १८.६ टक्के वाढ झाली असून, एक लाख ८० हजार ४८३ मोटारी निर्यात करण्यात आल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) म्हटले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत १० लाख २६ मोटारींची विक्री झाली, यात केवळ वार्षिक तीन टक्के वाढ नोंदवली गेली, असेही ‘सियाम’ने म्हटले आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत पहिल्या तिमाहीत घट होण्याचे एक कारण म्हणजे लहान मोटारींची मागणी कमी होत आहे. सेडान आणि हॅचबॅक मोटारींची देशांतर्गत विक्री जूनमध्ये १७.५ टक्क्यांनी घसरून तीन लाख ४१ हजार २९३ वर आली आहे. मॉन्सून आणि आगामी सणासुदीच्या हंगामात चांगल्या वाढीची अपेक्षा आहे, असे ‘सियाम’चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

वितरकांकडे शिल्लक साठा मोठा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, हे काळजीचे कारण नाही. कधी कंपनी जास्त उत्पादन करते, कधी कमी करते. हे चढ-उतार होतच राहतात. मागणी आणि पुरवठा यांच्यात चांगला समतोल आहे. समतोल राखण्यासाठी कंपन्या आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मारुती सुझुकी आणि टोयोटा सारख्या कंपन्या हायब्रीड मोटारींसाठी अधिक सवलती देण्याच्या बाजूने आहेत, तर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आदी कंपन्या सरकारला फक्त इलेक्ट्रिक मोटारींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहेत.

‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, जून २०२४ मध्ये एकूण १९ लाख ६७ हजार ९५९ वाहनांची विक्री झाली. जून २०२३ मधील १६ लाख ६४ हजार ४५१ वाहनांच्या तुलनेत त्यात १८.२३ टक्के वाढ झाली आहे.

यात प्रवासी मोटारींच्या विक्रीत मात्र १३.७२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुचाकींच्या विक्रीत मात्र, २१.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२४ मध्ये १६ लाख १४ हजार १५४ दुचाकींची विक्री झाली असून, जून २०२३मध्ये १३ लाख ३० हजार ८२६ वाहनांची विक्री झाली होती.

तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही १२.२९ टक्क्यांनी वाढ झाली असून, जून २०२४ मध्ये ५९ हजार ५४४ वाहनांची विक्री झाली आहे, जून २३ मध्ये हे प्रमाण ५३ हजार २५ होते. सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२३ मधील दोन लाख ८० हजार ५५३ वाहनांच्या तुलनेत जून २०२४ मध्ये दोन लाख ९४ हजार २३३ वाहनांची विक्री झाली आहे.

वाहनांची एकूण निर्यात २२.०४ टक्क्यांनी वाढली असून, जून २०२४ मध्ये तीन लाख ९३ हजार ५८५ वाहनांची निर्यात झाली आहे. जून २०२३ मध्ये हे प्रमाण तीन लाख २२ हजार ५१७ होते. वाहनांच्या उत्पादनातही २०.४५ टक्क्यांनी वाढ झाली असून, जून २०२४ मध्ये २३ लाख ५८ हजार ४१ वाहनांचे उत्पादन झाले, जून २०२३ मध्ये हे प्रमाण १९ लाख ५७ हजार ६४० होते.

अहवालातील ठळक बाबी

  • जून २०२४ मध्ये एकूण वाहनविक्री १९ लाख ६७ हजार ९५९, वार्षिक १८.२३ टक्के वाढ

  • दुचाकी विक्री २१.२९ टक्के, तीनचाकी विक्री १२.२९ टक्के वाढ

  • प्रवासी वाहनांची विक्री ४.८८ टक्के अधिक

  • एकूण निर्यात तीन लाख ९३ हजार ५८५, वार्षिक २२.०४ टक्के वाढ

  • उत्पादन २३ लाख ५८ हजार ४१ वाहने, वार्षिक २०.४५ टक्के वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT