Lorenzini Apparels
Lorenzini Apparels Sakal
Personal Finance

Lorenzini Apparels : 6 वर्षात 1 लाखाचे 41 लाख, आता तर स्टॉक स्प्लिटसह बोनस शेअर्सचा डबल धमाका...

सकाळ वृत्तसेवा

लॉरेन्झिनी ॲपेरेल्स (Lorenzini Apparels)आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. शिवाय त्यांचा स्टॉक स्प्लिटचाही प्लान आहे. स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 28 मार्च 2024 निश्चित करण्यात आल्याचे कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले.

स्टॉक स्प्लिट अंतर्गत 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले कंपनीचे शेअर प्रत्येकी 1 रुपयाचे फेस व्हॅल्यू असलेल्या 10 इक्विटी शेअर्समध्ये विभागले जातील. तर बोनस शेअर्ससंदर्भात कंपनीने सांगितवे की पात्र शेअरहोल्डर्सना 1 रुपयाचे फेस व्हॅल्यूचे शेअर्स जारी करतील.

28 मार्च 2024 पर्यंत कंपनीचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स मिळतील. लॉरेन्झिनी ॲपेरेल्स 16 फेब्रुवारी 2018 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले. सध्या शेअरची किंमत बीएसईवर 375.85 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 381 कोटी आहे. गेल्या वर्षभरात शेअरच्या किमतीत 341 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

16 फेब्रुवारी 2018 रोजी बीएसईवर लॉरेन्झिनी ॲपेरेल्सच्या शेअरची किंमत 9 रुपये होती. तेव्हापासून, शेअरची किंमत 4076 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत, जर कोणी या शेअरमध्ये 6 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 41.76 लाख रुपये झाले असते. तर एखाद्याने 50,000 रुपये गुंतवले असतील तर त्याचे 20.88 लाख झाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT