Amazon Global sakal
Personal Finance

Amazon Global : ‘अ‍ॅमेझॉन ग्लोबल’वर ५० हजार भारतीय उत्पादने

भारतीय निर्यातदारांनी ‘अ‍ॅमेझॉन ग्लोबल’च्या वार्षिक ‘ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल’साठी ५०,००० हून अधिक नवी उत्पादने सादर केली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बंगळुरू - भारतीय निर्यातदारांनी ‘अ‍ॅमेझॉन ग्लोबल’च्या वार्षिक ‘ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल’साठी ५०,००० हून अधिक नवी उत्पादने सादर केली आहेत.

त्यामुळे १७ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या या सेलद्वारे जगभरातील लाखो ग्राहकांपर्यंत ‘मेड इन इंडिया’ उत्पादने पोचणार आहेत. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या प्राइम बिग डील डेज सेलमध्ये, अ‍ॅमेझॉन ग्लोबलवरील भारतीय निर्यातदारांचा व्यवसाय नेहमीच्या कालावधीपेक्षा वार्षिक ७० ते १७० टक्क्यांनी वाढला.

यामध्ये गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, स्वयंपाकघरातील वस्तू, आरोग्य व वैयक्तिक निगा, फर्निचर या श्रेणींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. भारतीय वस्तूंना अमेरिका व ब्रिटनकडून सर्वाधिक मागणी आली, तर जपान व ऑस्ट्रेलिया या नव्या बाजारपेठा म्हणून उदयास आल्या आहेत. या देशांमध्ये दोन दिवसांमध्ये विक्रेत्यांनी वार्षिक २०० टक्के वाढ नोंदविली आहे.

भारतातून २०२५ पर्यंत २० अब्ज डॉलरची ई-कॉमर्स निर्यातीचे उद्दिष्ट असून, सागरी मालवाहतूक सुविधेसह सदस्यत्व शुल्क कपात केल्याचे ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’चे भूपेन वाकणकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

SCROLL FOR NEXT