Adani Electricity Sakal
Personal Finance

Adani Group: गणपत पाटील नगरमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीचा वीज देण्यास नकार; ग्रामस्थांनी काढला मोर्चा

Adani Group: दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर हे सीआरझेड क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात येत असल्यामुळे संबंधित कायद्यांच्या निर्बंधानुसार अदाणी इलेक्ट्रिसिटी तेथे वीज पुरवठा करू शकत नाही, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईतर्फे देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर हे सीआरझेड क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात येत असल्यामुळे संबंधित कायद्यांच्या निर्बंधानुसार अदाणी इलेक्ट्रिसिटी तेथे वीज पुरवठा करू शकत नाही, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईतर्फे देण्यात आले आहे.

यासंंदर्भात काल काही पक्षांतर्फे अदानी इलेक्ट्रिसिटीविरुद्द मोर्चा काढण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने २०११ मध्ये येथील अतिक्रमणे तोडताना कायदेशीर वीज जोडण्या देखील काढून टाकल्या होत्या.

हा विभाग वनक्षेत्रात असल्यामुळे सीआरझेड प्राधिकरण, वनविभाग, महापालिका आणि स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडून वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाने खारफुटी क्षेत्रात सर्व कामांवर बंदी घातली असल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी गणपत पाटील नगरात नवीन वीज पुरवठा जोडणी देऊ शकत नाही. महापालिकेने देखील येथे वीज जोडणी देण्यास प्रतिबंध केला आहे.

अशा स्थितीत आम्ही तेथे खांब उभारू शकत नाही, वीज वाहिनी टाकू शकत नाही किंवा बांधकामही करू शकत नाही, असेही अदानी इलेक्ट्रिसिटीने पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT