Adani Power close to taking over Coastal Energen for rs 3,440 crore
Adani Power close to taking over Coastal Energen for rs 3,440 crore  Sakal
Personal Finance

Adani Group: आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत गौतम अदानी, सिमेंटनंतर वीज क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

राहुल शेळके

Adani Group: अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवर ही दिवाळखोर वीज कंपनी कोस्टल एनर्जी विकत घेण्याचा विचार करत आहे. हा करार 3,440 कोटी रुपयांना होऊ शकतो. अदानी पॉवरने यासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. या शर्यतीत असलेली आणखी एक कंपनी जिंदाल पॉवरने माघार घेतली आहे. यामुळे अदानी पॉवरचा मार्ग मोकळा झाला आहे.

तामिळनाडूमध्ये कोस्टल एनर्जी कंपनीचे मोठे पॉवर प्लांट आहेत. या कारणामुळे कंपन्या कोस्टल एनर्जी खरेदी करण्यात रस दाखवत होत्या. यासाठी शेरीशा टेक्नॉलॉजीज, जिंदाल पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह यांच्याकडून निविदा आल्या होत्या.

Economic Timesच्या अहवालानुसार, दोन दिवस चाललेल्या बोली प्रक्रियेत शनिवारी संध्याकाळी अदानी पॉवरने बोली जिंकली. दिवाळखोर वीज कंपनी कोस्टल एनर्जी ताब्यात घेण्यासाठी बोली प्रक्रिया शुक्रवारी दुपारी सुरू झाली. ही प्रक्रिया शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहिली आणि यावेळी 18 बोलीच्या फेऱ्या झाल्यानंतर अदानी पॉवरची ही बोली जिंकली.

शेरीशा टेक्नॉलॉजीने बोलीमध्ये भाग घेतला नाही, तर जिंदाल पॉवरने 19व्या फेरीत पर्यंत मजल मारली. शेवटच्या फेरीत अदानी पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने 3,440 कोटी रुपयांची बोली लावली होती.

तामिळनाडूमध्ये कोस्टल एनर्जीचे दोन ऊर्जा प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पांची क्षमता 600 मेगावॅट आहे. कंपनीचा तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशनसोबत वीज खरेदी करार देखील आहे, जो सप्टेंबर 2028 पर्यंत आहे. त्यामुळे ही कंपनी अदानी समूहासाठी महत्त्वाची आहे. या करारानंतर अदानी पॉवरचा आणखीन विस्तार होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT