Amazon Laying off Hundreds in Prime Video, Studios in Latest Cuts  Sakal
Personal Finance

Amazon Lay Off: ॲमेझॉनने पुन्हा केली कर्मचारी कपातीची घोषणा; शेकडो कर्मचाऱ्यांच्या जाणार नोकऱ्या

Amazon Lay Off : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीचे प्रमुख माईक हॉपकिन्स यांनी बुधवारी कर्मचार्‍यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये कर्मचारी कपातीची घोषणा केली.

राहुल शेळके

Amazon Lay Off : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीचे प्रमुख माईक हॉपकिन्स यांनी बुधवारी कर्मचार्‍यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली.

हॉपकिन्सने ईमेलमध्ये काय म्हटले?

हॉपकिन्स यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, "आम्ही काही क्षेत्रात गुंतवणूक कमी किंवा बंद करण्याचा विचार करत आहेत. परिणामी आम्ही प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओमध्ये कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे."

या ईमेलमध्ये त्यांनी लिहिले, "व्यवसायासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रतिभावान Amazon कर्मचार्‍यांना निरोप देणे कठीण आहे. तुमच्या समर्पण आणि कार्याबद्दल धन्यवाद."

ट्विचनेही केली कर्मचारी कपातीची घोषणा

याआधी अॅमेझॉनच्या लाइव्ह गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी ट्विचनेही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी या आठवड्यात आपल्या 35 टक्के कर्मचारी म्हणजेच सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे.

ट्विचने गेल्या वर्षी अनेक कर्मचार्‍यांना काढून टाकले आणि वाढत्या खर्चामुळे दक्षिण कोरियामधील व्यवसाय बंद केला. अॅमेझॉनने 2022 च्या उत्तरार्धात आणि 2023 च्या सुरुवातीस कर्मचारी कपातीची घोषणा केली होती.

गेल्या वर्षी Amazon.com ने त्यांच्या संगीत विभागातील कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते. गेल्या वर्षभरात कंपनीतील 27,000 हून अधिक कर्मचार्‍यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT