Ayushman Bharat Yojana Sakal
Personal Finance

Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्यमान भारत’ योजनेची व्याप्ती वाढविणार? मोठी घोषणा होण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. आरोग्य विम्याचे हे कवच वाढवत दहा लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यावर सरकार विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या २३ तारखेला संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळी याबाबतची घोषणा होऊ शकते.

आयुष्मान भारत ही योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली होती. देशातील गरीब नागरिकांना आरोग्य विम्याचे कवच मिळावे, हा योजनेचा उद्देश आहे. मोफत उपचाराची मर्यादा दुपटीने वाढविण्यात आली तर सरकारवर १२ हजार ७६ कोटी रुपयांचा भार पडेल, असा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा अंदाज आहे.

ज्येष्ठांनाही लाभ

आयुष्यमान भारत योजनेत पूर्वी ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश नव्हता. मात्र अलीकडेच ७० वर्षांवरील नागरिकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला होता. वाढती महागाई तसेच वैद्यकीय उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने विम्याचे कवच वाढविले जाणार असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT