Bajaj-Allianz Life Insurance Chief Agency Officer Sameer Joshi sakal
Personal Finance

Sameer Joshi : विमा क्षेत्राकडे युवकांचा वाढता ओढा

विमा अतिशय गरजेचा असल्याचे कोरोनाच्या काळात अधोरेखित झाल्यामुळे विमा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या युवकांचीही संख्याही आता वाढत असल्याचे निरीक्षण बजाज- अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर समीर जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना नुकतेच सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विमा अतिशय गरजेचा असल्याचे कोरोनाच्या काळात अधोरेखित झाल्यामुळे विमा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या युवकांचीही संख्याही आता वाढत असल्याचे निरीक्षण बजाज- अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर समीर जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना नुकतेच सांगितले.

बजाज अलियान्झचे देशात दुसऱ्या क्रमांकाचे एजन्सी चॅनेल नेटवर्क असून, त्यात तब्बल एक लाख ४२ हजार एजंट्स आहेत. गेल्या वर्षात त्यात ४० हजारहून अधिक एजंटांची भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा व्यवसाय मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत २६ टक्क्यांनी वाढला आहे. हा व्यवसाय १,३४७ कोटींवरून १,६९४ कोटी रुपये झाला आहे.

या पार्श्वभूमीवर जोशी म्हणाले, ‘‘इंग्लंड आणि युरोपमध्ये विम्याचे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. परंतु, आपल्या देशात हे प्रमाण चार ते पाच टक्केच आहे. कोरोनानंतर विमा क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. त्यात विमा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात युवकांबरोबरच व्यावसायिक, निवृत्त, नोकरदार, गृहिणी, म्युच्युअल फंड एजंट, अभियंते, शासकीय सेवेतील नोकरदार, रिअल इस्टेट एजंट्स, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, वकील, शेतकरी, वैद्यकीय व्यावसायिक आदींचाही समावेश आहे. युवक प्रामुख्याने पूर्ण वेळ विमा क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असून, त्यांना दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविणे शक्य आहे.’’

विमा क्षेत्रात आयुर्विम्याला महत्त्व आहे. मृत्यूपश्चात फायद्यांपेक्षा हयात असतानाही विम्याची मुदत संपल्यावर कोणत्या सुविधा मिळतिल, यावर ग्राहकांचा आता अधिक भर आहे. बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने त्यानुसार विमा योजनांची निर्मिती केली आहे. त्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी एजंट्स महत्त्वाचे आहेत. ‘बजाज’चे देशातील सर्व एजंट्स ‘ बिना मिले, मिलकर’ संकल्पनेनुसार डिजिटल पद्धतीने काम करू लागले आहेत.

त्यासाठी त्यांना ११ प्रादेशिक भाषांमध्ये शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. बजाज ही भारतीय कंपनी असून, अलियान्झ ही जर्मनीची भागीदार कंपनी आहे, ती गेल्या १२५ वर्षांपासून विमा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे ग्राहकांचा बजाज अलियान्झ भागीदारीवर विश्वास आहे. त्यामुळेच कंपनीचा विमा व्यवसाय वेगाने वाढत असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओरिसापाठोपाठ आता दक्षिणेतील राज्यांमध्ये कंपनी विस्तार करत असून, तिथल्या बॅंकाही मोठ्या प्रमाणावर सोबत काम करण्यास इच्छुक असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT