Bank Clinic Sakal
Personal Finance

Bank Clinic : ‘बँक क्लिनिक’ तक्रार निवारणाचा मार्ग

बँकेच्या सेवेबद्दल तक्रार नोंदवताना प्रथम या संकेतस्थळावर लॉग-इन करून आपली बँक, शाखा, खात्याचा तपशील व तक्रारीचे स्वरूप हा तपशील भरून अपलोड करून, एक तिकीट क्रिएट करावे लागते.

सुधाकर कुलकर्णी

बँकेकडून ग्राहकांना विविध सेवासुविधा दिल्या जातात (उदा. बचत खाते, ठेव खाते, कर्ज, लॉकर, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट, मोबाइल बँकिंग आदी). या सुविधांचा वापर करताना प्रत्येक वेळी बँकेकडून चांगली सेवा मिळतेच असे नाही. काही वेळा खूप उशीर होतो, कधी बँकेच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होते, मनस्ताप होतो.

अशा वेळी बँकेकडे तक्रार करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तक्रार नेमकी कशी आणि कोठे करायची याबाबत अनेक ग्राहकांना माहिती नसते. सर्वसाधारणपणे बँकेच्या ज्या शाखेत खाते आहे, त्या शाखेत जाऊन तक्रार केली जाते.

मात्र, शाखा पातळीवर ग्राहकांना आवश्यक ते मार्गदर्शन किंवा प्रतिसाद मिळलेच, असे नाही. यावर पर्याय म्हणून बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने (एआयबीईए) नुकतीच ‘बँक क्लिनिक’ ही अनोखी सेवा सुरू केली आहे. ही ऑनलाइन सुविधा असून, यासाठी Banksclinic.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ग्राहक त्यावर आपली तक्रार नोंदवू शकतात.

ऑनलाइन तक्रार नोंदवताना...

बँकेच्या सेवेबद्दल तक्रार नोंदवताना प्रथम या संकेतस्थळावर लॉग-इन करून आपली बँक, शाखा, खात्याचा तपशील व तक्रारीचे स्वरूप हा तपशील भरून अपलोड करून, एक तिकीट क्रिएट करावे लागते.

त्यानंतर पुढील पाच दिवसांत आपल्याला तक्रार निवारण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते; तसेच याबाबतच्या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांची माहितीही दिली जाते. ग्राहकाची तक्रार संबंधित बँकेकडे पाठविली जाते.

या संकेतस्थळावर नोंदवलेल्या, तक्रारीवरील अंतिम निर्णय संबंधित बँकच घेत असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हे संकेतस्थळ ग्राहकांना आवश्यक ते मार्गदर्शन करते, यामुळे आपली तक्रार रास्त आहे, की अवाजवी आहे, याची कल्पना ग्राहकांना येऊ शकते आणि त्या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचनांची माहिती मिळाल्याने, आपल्या तक्रारीचे कितपत निवारण होऊ शकेल, याचाही अंदाज येऊ शकतो.

त्यानुसार, पुढे पाठपुरावा करावा की नाही याचाही निर्णय घेता येतो. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्यक्ष बँकेत जाऊन तक्रार करणे व पुढे त्याचा पाठपुरावा करणे अनेकदा शक्य होत नाही. ही अडचण या सुविधेमुळे दूर होऊ शकते.

ग्राहकांना आपली तक्रार ऑनलाइन नोंदवता येणार असून, ती रास्त आहे की नाही, याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे तक्रारींचे जलद निराकरण होऊ शकेल आणि बँकानाही आपल्या सेवेतील त्रुटींची माहिती होईल. परिणामी, बँकांची ग्राहक सेवा सुधारण्यास मदत होईल. थोडक्यात, बँकेच्या सेवासुविधांबाबत काही तक्रार असेल, तर Banksclinic.com ही अभिनव सुविधा उपलब्ध झाली आहे, तिचा वापर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT