Buddha Purnima bank holiday 2024 Are banks closed tomorrow Check details  Sakal
Personal Finance

Bank Holiday: बुद्ध पौर्णिमेमुळे उद्या 'या' राज्यांमध्ये बँका राहणार बंद; पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Buddha Purnima Bank Holiday 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ग्राहक डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात.

राहुल शेळके

Buddha Purnima Bank Holiday 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ग्राहक डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही बँकेच्या सुट्टीतही पैशाशी संबंधित काम सहज हाताळू शकाल.

कोणत्या राज्यात बँका बंद आहेत?

त्रिपुरा, महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

बुद्ध पौर्णिमा ही जगभरातील बौद्धांसाठी सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा मे महिन्यात साजरा केला जातो. हा दिवस भगवान बुद्धांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटनांचे स्मरण करतो, लुंबिनी येथे त्यांचा जन्म, बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती आणि कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले.

मे मध्ये बँक सुट्ट्या

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या यादीनुसार, मे 2024 मध्ये बँका 14 दिवस बंद आहेत. महाराष्ट्र दिन/मे दिवस (कामगार दिन), लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन, बसव जयंती/अक्षय तृतीया, राज्यत्व दिन, बुद्ध पौर्णिमा यामुळे बँका मे महिन्यात बंद असतात.या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात.

25 मे रोजी बँकेला सुट्टी

त्रिपुरा, ओडिशा येथे नजरूल जयंती/लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (4था शनिवार) निमित्त बँका बंद राहतील.

25 मे 2024 रोजी चौथा शनिवार असल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 26 मे रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर आरबीआयच्या सुट्टीच्या यादीनुसार तुमच्या कामाचे नियोजन करा.

बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा परिस्थितीत बँका सलग अनेक दिवस बंद राहिल्यास ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांची अनेक महत्त्वाची कामे अडकून पडतात, पण बदलत्या काळानुसार आणि डिजिटलायझेशनमुळे तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. तर UPI द्वारे पैसे सहज ट्रान्सफर करता येतात. याशिवाय पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT