- दत्तात्रय मुळे
कोणत्याही व्यवसायाची वाढ ही सरळ रेषेत नसते. त्यात वाढ, मंदी, पुन्हा उभारी; तसेच विस्ताराच्या चक्रांचे टप्पे येऊ शकतात. गुंतवणुकीचे विविध निर्णय घेताना या चक्रांचा परिणामकारक वापर करून घेतल्यास, संपत्तीनिर्माणाला चांगली चालना मिळू शकते.
एखादी कंपनी किंवा क्षेत्र कोणत्या चक्रात आहे, हे ओळखण्यास मदत करणारे अनेक घटक आहेत. उदा. ग्राहकांच्या खर्चात कपात, नोकऱ्यांमधील कपात, वेतनवाढ न होणे, विस्ताराच्या योजनांमध्ये विलंब किंवा त्या स्थगित करणे आणि क्षमतांचा पूरेपूर वापर न होणे ही आगामी मंदीची स्पष्ट लक्षणे आहेत.
दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि खर्च, कारखाने पूर्ण क्षमतेने चालणे किंवा त्यांच्या विस्ताराच्या योजना, वाढते पगार व नोकऱ्यांची वाढती संधी हे सर्व घटक वाढीच्या टप्प्यांचा निर्देश करतात.
एखाद्या आर्थिक स्थितीला प्रत्येक व्यवसाय एकाच पद्धतीने प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देईल असे नाही. व्यवसायांचे वैविध्यपूर्ण स्वरूप पाहता त्यांच्या चक्राचे टप्पे, परिस्थितीला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी घेतलेला वेळ, हे सर्व वेगवेगळे असतात.
संपत्ती निर्मितीची शक्यता येथेच दडलेली असते. व्यवसायचक्रांवर आधारलेली गुंतवणूक महागाई, वाढ, तूट आदी विविध व्यापक निर्देशांकांच्या आधारे या संधींचा लाभ घेऊ पाहाते. हे निर्देशांक व्यवसायचक्र निश्चित करण्यात कळीची भूमिका निभावतात.
व्यापक आर्थिक निकष आणि अर्थव्यवस्थेवरील त्यांचे परिणाम समजून घेणे, सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीने अवघड असते. अशा वेळी म्युच्युअल फंडांसारखे व्यावसायिक व्यवस्थापन असलेले आणि प्रक्रियेवर आधारित गुंतवणूक करणारा पर्याय उपयुक्त ठरतो.
व्यवसायचक्रावर आधारित गुंतवणुकीची निवड करू इच्छिणारे गुंतवणूकदार बिझनेस सायकल फंडांचा विचार करू शकतात. या फंडांचे व्यवस्थापक बदलत्या व्यापक परिस्थितीनुसार पोर्टफोलिओची रचना करतात, जेणेकरून जास्तीत जास्त संधींचा लाभ घेता येईल.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बिझनेस सायकल फंड हा व्यवसायचक्रावर आधारित गुंतवणूक करणारा एक आघाडीचा फंड आहे. जानेवारी २०२१ मध्ये सुरू झालेल्या फंडाने आपल्या स्थापनेपासून २५.६ टक्के एवढा दमदार एकत्रित वार्षिक विकासदर (सीएजीआर) नोंदवला आहे. या फंडाने २९ एप्रिल २०२४ पर्यंत ५२.२० टक्के एवढा वार्षिक परतावा दिला असून, दोन आणि तीन वर्षांच्या मुदतीसाठी अनुक्रमे २७.३५ टक्के आणि २६.२९ टक्के एवढा सशक्त एकत्रित वार्षिक विकासदर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.