Economic Survey 2024 Sakal
Personal Finance

Economic Survey: भारत 'या' क्षेत्रात चीनची जागा घेऊ शकत नाही; आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय सांगितलं आहे?

Economic Survey 2024: जगातील अनेक बड्या कंपन्या चीनमधून बाहेर पडून इतर देशांमध्ये उत्पादन करण्याचा आग्रह धरत आहेत. भारताला या संधीचा फायदा घ्यायचा आहे, त्यासाठी भारत सरकारने अनेक क्षेत्रांसाठी PLI योजना आणली आहे.

राहुल शेळके

Economic Survey 2024 Updates: जगातील अनेक बड्या कंपन्या चीनमधून बाहेर पडून इतर देशांमध्ये उत्पादन करण्याचा आग्रह धरत आहेत. भारताला या संधीचा फायदा घ्यायचा आहे, त्यासाठी भारत सरकारने अनेक क्षेत्रांसाठी PLI योजना आणली आहे. पण उत्पादन क्षेत्रात भारत चीनला मागे टाकू शकत नाही, असे आर्थिक सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पुरवठा साखळीत चीनचे वर्चस्व

आर्थिक सर्वेक्षणात भारत-चीन व्यापार संबंधांवर एक संपूर्ण प्रकरण लिहिले गेले आहे. सर्वेक्षणानुसार भारत आणि चीनमधील आर्थिक संबंध अतिशय गुंतागुंतीचे आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. अनेक उत्पादनांच्या जागतिक पुरवठा साखळीतील चीनचे वर्चस्व हे जागतिक चिंतेचे कारण बनले आहे.

विशेषत: युक्रेन-रशिया युद्धादरम्यानच्या पुरवठ्यातील समस्यांमुळे ही चिंता आणखी वाढली आहे. G-20 देशांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्याचा आर्थिक विकास दर चीनपेक्षा जास्त आहे. असे असूनही चीनच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था खूपच लहान आहे.

भारत चीनची जागा घेऊ शकत नाही

क्रिटिकल आणि रेअर अर्थ मिनरल्सच्या उत्पादनात आणि प्रक्रियेत चीनच्या मक्तेदारीमुळे जगभरातील चिंता वाढली आहे. याचा भारताच्या अक्षय ऊर्जा कार्यक्रमावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो कारण भारत अक्षय ऊर्जेसाठी आयात केलेल्या कच्च्या मालावर अवलंबून आहे.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, अशा परिस्थितीत चीनच्या उत्पादनात काही बाबतीत मागे पडल्याचा भार भारत उचलू शकतो, असा विचार करणे योग्य ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT