Canara Bank  Sakal
Personal Finance

Canara Bank : कॅनरा बँकेतर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी नव्या सुविधा आणि योजना दाखल

बँकेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेच्या ‘इनोव्हेशन हब’चे सीईओ राजेश बन्सल, कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ के. सत्यनारायण राजू, कार्यकारी संचालक देबाशीष मुखर्जी, अशोक चंद्रा, हरदीप यांच्या उपस्थितीत या सेवासुविधांचे आणि योजनांचे उद्‍घाटन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कॅनरा बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा आणि योजना दाखल केल्या आहेत. बँकेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेच्या ‘इनोव्हेशन हब’चे सीईओ राजेश बन्सल, कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ के. सत्यनारायण राजू, कार्यकारी संचालक देबाशीष मुखर्जी, अशोक चंद्रा, हरदीप यांच्या उपस्थितीत या सेवासुविधांचे आणि योजनांचे उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी ‘कॅनरा हील’ या आरोग्यसेवेसाठीच्या कर्ज योजनेसह महिलांसाठी कॅन्सर केअर पॉलिसीची सुविधा देणारे ‘कॅनरा एंजल’ हे विशेष बचत खाते, ‘कॅनरा रेडीकॅश’ ही पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज योजना; तसेच मुदतठेवीवर ऑनलाइन कर्ज देणारी ‘कॅनरा मायमनी’ योजना दाखल करण्यात आली.

‘कॅनरा यूपीआय १२३ पे एएसआय’ हा सुलभ पेमेंट इंटरफेस आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘कॅनरा एचआरएमएस’ या अॅपचे अनावरणदेखील यावेळी करण्यात आले. यावेळी राजेश बन्सल यांच्या हस्ते ‘कॅनरा एसएचजी ई-मनी’ नावाने स्वयंसहाय्यता गटासाठी डिजिटल सुविधेचे अनावरण करण्यात आले. या सुविधेमुळे रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन हबच्या सहकार्याने स्वयंसहाय्यता गटांना डिजिटल कर्जसेवा देणारी कॅनरा बँक ही पहिली बँक ठरली आहे.

बँकेने मिडीअसिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेस आणि बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स या दोन कंपन्यांबरोबर ‘कॅनरा हील’ योजनेबाबत सामंजस्य करारही केला. ‘मिडीअसिस्ट’चे सीईओ गिदुगु सतीश आणि ‘बजाज अलियान्झ’च्या वरिष्ठ अध्यक्ष अल्पना सिंग यावेळी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT